पुणे : पुण्यात संपत्तीच्या वादाववरुन धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाने एका महिलेची साडी चोरून कोथरूड येथे एका मांत्रिकाकडे नेऊन लिंबू, टाचण्या टोचून अघोरी कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतुशृंगी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर आमानुष,अनिष्ट व आघोरी प्रथा यांना प्रतिबंध घालण्याच्या व त्याचा समूळ उच्चाटन करण्यात अधिनियम कलमा नुसार सावत्र आई, मामा, आजी, चुलत बहिण यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अनिकेत विनोद सुपेकर यांनी तक्रार दिली आहे. आजी कांता सुरेश चव्हाण, मामा गिरीश सुरेश चव्हाण, सावत्र आई संगीता सुपेकर, सावत्र भाऊ स्वप्निल सुपेकर, चुलत बहीण सोनल सुपेकर व देवऋषी स्वप्निल भोकरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आजी कांता सुरेश चव्हाण (वय ७०), मामागिरीश सुरेश चव्हाण (वय ३५, दोघे रा. जनवाडी), सावत्र आई संगीता सुपेकर (वय ४५), सावत्र भाऊ स्वप्निल सुपेकर (वय २३), चुलत बहीण सोनल प्रविण सुपेकर (वय ३०), देवऋषी स्वप्नील भोकरे (तिघे रा. कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जनवाडी येथे ११ व १३ ऑगस्ट रोजी घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची आजी कांता चव्हाण या जनवाडी जनता वसाहतीत शेजारी शेजारी रहातात. दरम्यान, फिर्यादी सुपेकर याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यांची सावत्र आई कोथरुडमध्ये राहायला आहे. फिर्यादी यांच्या पंजीच्या नावावर असलेल्या दोन खोल्यांपैकी एक आईच्या नावावर व दुसरी मावशीच्या नावावर करणार होती. त्यावरुन त्यांच्या वाद आहे. या पूर्वी फिर्यादीने मामावर करणी केल्याने त्याचे लग्न होत नाही, असे फिर्यादीच्या आजी व मामाला वाटत असल्याने देखील त्यांच्यात पूर्वीपासून वाद होते.
दरम्यान ११ ऑगस्टरोजी फिर्यादीच्या आईची घराबाहेर वाळत घातलेली साडी चोरीला गेली. यावेळी त्यांनी घरा जवळ लावलेले सीसीटीव्ही तपासले. यात आजी व तिच्याकडे भाड्याने राहणार्या एका मुलीने ती चोरुन नेल्याचे दिसले. यामुळे फिर्यादीचा संशय बळावला. त्यांनी १३ ऑगस्ट रोजी आजीच्या घरात गेले. यावेळी त्या ठिकाणी त्यांची आई, मावशी, काकु यांचे फोटो ठेवून फोटोला आणि साडीला अंडी, टाचण्या लावलेले लिंबु, भेळ, भात काळीज, मटण, हळद, कुंकु, अगरबत्ती, कापूर पदार्थ ठेवल्याचे दिसले. यावेळी देवऋर्षी मंत्रोउच्चार करत अघोरी कृत्य करत होते. यावेळी याचा जाब फियार्दी सुपेकर यांनी विचारला असता, आजी कांता चव्हाण हिने तुम्हाला भिकेला लावले, आमची प्रॉपर्टी घेतली. आम्ही तुमच्यावर करणी करुन तुम्हाला मारुन टाकणार असे म्हणत धमकावले.या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चतुर्शिंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की तक्रारदार आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत त्यांच्या मालमत्तेचे तसेच किरकोळ कारणावरून वादविवाद आहेत तक्रारदार तरुण येथे लग्न ठरवू नये याकरता आरोपी जादूटोण्याची आघोरी कृत्य करत असल्याचे तक्रारदार यांचे सांगणे आहे या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे