मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात गोदामची भिंत फोडत तब्बल १२ लाख रुपयांची वाईन केली लंपास

Pune Crime : पुण्यात गोदामची भिंत फोडत तब्बल १२ लाख रुपयांची वाईन केली लंपास

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 10, 2022 10:11 AM IST

पुण्यातील सासवड मार्गावर असलेल्या एका वाईन शॉपच्या गोदामाची भिंत फोडत चोरट्यांनी तब्बल १२ लाख रुपयांची दारू लंपास केली आहे.

पुणे क्राइम
पुणे क्राइम

पुणे : पुण्यात गोदामच्या भिंती फोडून चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यातील सासवड रस्त्यावर घडली आहे. येथील वाईनच्या गोदामची भिंत फोडून तब्बल १२ लाख रुपयांच्या वाईनच्या बाटल्यांची खोकी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. एवढेच नाही तर चोरी सापडू नये यासाठी गोदामात लावलेले सीसीटीव्ही आणि त्याचा डीव्हीआर चोरट्यांनी पळवला आहे. या परकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

या प्रकरणी वाईन एंटरप्रायजेस प्रा. लि. चे संतोष केशवे (वय ३३, रा. शेवाळवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासवड रस्त्यावरील वडकी, ऊरळी देवाची, मंतरवाडी भागात गोदामे आहेत. गोदामांमध्ये विविध कंपन्यांच्या मालाची साठवणूक केली जाते. पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी पथकांची स्थापना केली असून ती चोरट्यांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहे.

सासवड रस्त्यावरील श्रीनाथ एंटरप्रायजेस गोदामात केशवे यांच्या कंपनीच्या वाईनची खोकी ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी गोदामाची भिंत मंगळवारी पहाटे फोडली. गोदामातील वेगवेगळ्या कंपनीच्या वाईनच्या बाटल्या खोक्यात ठेवण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी वाईनच्या बाटल्यांची खोकी लांबविली. चोरट्यांनी १२ लाख ६५ हजारांचे बाटल्या लांबविल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग