Loksabha Election 2024 : प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर? सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Loksabha Election 2024 : प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर? सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Loksabha Election 2024 : प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर? सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Mar 19, 2024 04:09 PM IST

Praniti Shinde in Loksabha Election: प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. भाजपने प्रणिती शिंदेंना ऑफर दिली होती. मात्र आम्ही ती ऑफर नाकारली,असा खुलासा शिंदेंनी केला.

प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर
प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर

अशोक चव्हाण यांच्यानंतर भाजप अन्य काँग्रेस नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अजून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सोलापूर मध्ये विधानसभेच्या आमदार प्रणिती शिंदे सोलापूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. सोलापूरमधून माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता असून काही दिवसांत माझी उमेदवारी जाहीर होई, असे प्रणिती शिंदे यांनी जाहीर केलं आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे आहे. 

दरम्यान प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. भाजपने प्रणिती शिंदेंना ऑफर दिली होती. मात्र आम्ही ती ऑफर नाकारली, असा खुलासा शिंदेंनी केला.

सोलापूर मतदारसंघात भाजपकडे तगडा उमेदवार नसल्याने भाजप नेते काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी उत्सूक असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर सुशील कुमार शिंदे यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. शिंदे म्हणाले, भाजपने प्रणिती शिंदे यांना फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रणिती तिच्या तत्वांशी, काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक असल्याने तिने भाजपाची ऑफर नाकारली.

सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, प्रणिती शिंदे यांना भाजपने ऑफर दिल्याचा दावा केला आहे. भाजपच्या मनामध्ये काय आहे हे आम्ही सांगू शकत नाही. त्यांनी अनेक वेळा ऑफर दिली. पण प्रणिती यांना हे पटत नाही. ज्या लोकांनी तीन  वेळा निवडून दिलं, त्यांना दगा देता येणार नाही, असंही शिंदे म्हणाले.

प्रणिती तिच्या विचारांवर ठाम आहे. ती काँग्रेसशी प्रामाणिक आहे. गांधी- नेहरूंचे विचारांसोबत ती राहणार आहे. देशात अशा विचारांच्या कार्यकर्त्यांची संख्या खूप आहे. प्रणितीसुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे. पक्ष सोडून जाणं तिला पटत नाही. आतापर्यंत ज्या जनतेने आपल्याला तीन वेळा निवडून दिलं आहे त्या जनतेला आणि पक्षाला ती सोडून जाऊ इच्छित नाही.

मात्र दुसरीकडे भाजपा तिला आपल्या पक्षात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे. सोलापूरच्या जागेसाठी ते प्रयत्न करत आहेत. प्रणितीला आपल्या पक्षात घेण्यासाठी त्यांनी आतापर्यंत खूप प्रयत्न केले. परंतु, प्रणितीने तसा विचारच केला नाही. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर