मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिले जाईल का? शरद पवार म्हणाले...

Sharad Pawar : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिले जाईल का? शरद पवार म्हणाले...

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 21, 2022 04:11 PM IST

शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी२९आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे, यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शरद पवार
शरद पवार

नवी दिल्ली -शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मोठ्या बंडाच्या पावित्र्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तीन प्रस्ताव दिले आहेत. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करू नये, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर स्वत:साठी उपमुख्यमंत्री पदाची मागणी शिंदे यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचे समजते. यावर महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी२९आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. पण त्यांना मुख्यमंत्रिपद द्यावं की नाही द्यावं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यातून कोणता कोणता तरी मार्ग निघणार आहे,अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. नवी दिल्लीत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केलं आहे.

शरद पवार म्हणाले की, मला तिथली जी परिस्थिती दिसत आहे,त्यातून कोणता ना कोणता तरी मार्ग निघणार आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशी चर्चा मी माध्यमातून ऐकतोय,पण पक्षात पदे देण्याची जबाबदारी आहे ती पक्षप्रमुखांवर आहे. जर त्यांच्या पक्षामध्ये कुणाला काही जबाबदारी द्यायची आहे,तो शिवसेनेचा निर्णय असणार आहे. त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यांनी जर पक्ष म्हणून काही निर्णय घेतला तर आम्ही त्या निर्णयाला पाठिंबा देऊ'असं पवारांनी स्पष्ट केलं.

पण मला पूर्ण विश्वास आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार चालवणार आहोत. कोणतेही बदल करण्याची गरज नाही,असंही पवारांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे,मागील अडीच वर्षांपासून दोन वेळा झाले आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार बनलं होतं. आमचे आमदार उचलून हरियाणा आणि गुरगावमध्ये आणून ठेवले होते. पण तिथूनही ते आमदार परत आले होते. त्यानंतर सरकार स्थापनं झालं,असं पवारांनी सांगितलं.

अमित शहांना कोण कुठे भेटणार आहे,याबद्दल मी सांगू शकणार नाही. विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस मतदान होत असतं. मागेही अनेक निवडणुकीमध्ये असे प्रकार घडले आहे,त्यामुळे सरकार काही पडले नाही. सरकार हे कायम राहिले आहे,असंही पवारांनी आवर्जुन सांगितलं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या