मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याच्या रागातून नवऱ्यानं ८ वाहने पेटवली, कोंढव्यातील घटना

Pune Crime : बायको नांदायला येत नसल्याच्या रागातून नवऱ्यानं ८ वाहने पेटवली, कोंढव्यातील घटना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 14, 2023 12:30 PM IST

Pune Crime : कोंढव्यात बायको नांदायला येत नसल्यामुळे बिथरलेल्या नवर्याने बायकोच्या गडीसह परिसरातील ८ वाहने पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime
Pune Crime

पुणे : पुण्यातील कोंढव्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बायको नांदायला येत नसल्यामुळे बिथरलेल्या नवऱ्याने चक्क बायकोच्या दुचाकीवर पेट्रोल ओतून तिची गाडी पेटवली. एवढेच नाही तर आजू बाजूची ८ वाहने देखील पेट्रोल टाकून पेटवली. या प्रकरणी कोंढवा पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेनेन्स डॉमनिक असे आरोपी नवऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीची पत्नी एलिनया आयझिक जेकब (वय २४) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेनेन्स डॉमनिक आणि एलिनया आयझिक जेकब हे दोघे पती पत्नी असून काही वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांत भांडणे वाढल्यामुळे एलिनया आयझिक जेकब या पती पासून वेगळ्या राहत होत्या. एवढेच नाही तर त्यांनी आरोपी पासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

तसेच घटस्फोटासाठी अर्ज देखील केला होता. याचा राग आल्याने आरोपी रेनेन्स डॉमनिकने आश्रफ नगर लेन नं २ आलीफ टॉवर येथे सोमवारी सायंकाळी फिर्यादीची दुचाकीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. एवढेच नाही तर रागाच्या भरात बाजूला असलेली १ मोटार, रिक्शा आणि ४ गाड्यांवर पेट्रोल टाकून त्या देखील पेटवून दिल्या. या घटनेत दुचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

IPL_Entry_Point

विभाग