मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Crime : आधी दारू पाजली, मग सर्पदंश दिला; प्रॉपर्टीसाठी बायकोनं रचला नवऱ्याच्या हत्येचा कट

Nashik Crime : आधी दारू पाजली, मग सर्पदंश दिला; प्रॉपर्टीसाठी बायकोनं रचला नवऱ्याच्या हत्येचा कट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 01, 2024 11:27 AM IST

Nashik Crime news : नाशिकमध्ये नवऱ्याच्या संपत्तीसाठी त्याला दारू पाजून सर्पदंश देऊन जीवे मारण्याचा कट बायकोने रचल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Crime News
Crime News

Nashik Crime news : नवरा बायकोचे नाते हे अतूट असते. मात्र, नाशिकमध्ये या नात्याला काळिमा फसणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याची संपत्ती हडप करण्यासाठी बायकोच त्याच्या जिवावर उठली. या साठी तिने कट रचला. आधी नवऱ्याला दारू पाजली आणि त्यानंतर त्याला सर्पदंश देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुदैवाने बायकोच्या या काटामधून नवरा वाचला आहे. ही घटना नाशिकच्या बोरगड परिसरात घडली आहे.

Maharashtra Police Bharti : तयारीला लागा! राज्यात होणार मेगा पोलीस भरती; तब्बल १७,४७१ पदे भरली जाणार

सोनी उर्फ एकता जगताप असं या आरोपी महिलेचे नाव आहे, तर विशाल पाटील असे पीडित नवऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल पाटीलच्या संपत्तीवर पत्नी सोनी हीचा डोळा होता. या मात्र, पती तिच्या नावावर संपत्ति करत नव्हता. यामुळे तिने त्याला ठार मारण्याची योजना बनवली. या साठी तिने तिच्या दोघा साथीदारांची मदत घेतली. सोनी हिने आधी विशालला गोडी गुलाबीत बियर पाजली. त्याला नशा चढल्यावर त्याला सर्पदंश केला.

Mumbai: ३२३ स्क्वेअर फूट जागेत बनवला २ बीएचके, बघा कांदिवली अपार्टमेंटचा viral video

मात्र, त्याचा काही परिणाम झाला नसल्याने तिने त्याचा गळा आवळला. एवढेच नाही तर दोन साथीदारांच्या मदतीनं पतीचं तोंड उशिने दाबून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातूनही त्याचा जीव वाचला. पत्नीच्या तावडीतून वाचलेल्या या पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

त्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधी पत्नीन बीअर पाजून संर्पदश केला, तसेच डोक्यात हेल्मेटने मारल्याचे त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी महिला आणि तिच्या दोन साथिदारांवर गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.

WhatsApp channel