मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पतीशी प्रेमसंबंधामुळं महिला वेटरला पत्नीकडून बेदम मारहाण; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

पतीशी प्रेमसंबंधामुळं महिला वेटरला पत्नीकडून बेदम मारहाण; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 05, 2022 01:16 PM IST

Thane Crime News : आरोपी पत्नीच्या पतीचं एका हॉटेलमधील महिला वेटरसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळं संतापलेल्या पत्नीनं महिला वेटरला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Thane Crime News Marathi
Thane Crime News Marathi (HT_PRINT)

Thane Crime News Marathi : पतीसोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळं संतापलेल्या पत्नीनं सासरच्या मंडळींच्या मदतीनं एका हॉटेलमधील महिला वेटरला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी महिलेनं वेटरला तिच्या घरात शिरून मारहाण केल्यानं ठाणे शहरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील श्रीनगर परिसरात एका पुरुषाचं हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिला वेटरशी प्रेमसंबंध होते. याबाबतची माहिती पुरुषाच्या पत्नीला समजल्यानंतर तिनं सासरच्या मंडळींना सोबत घेऊन महिला वेटरचं घर गाठलं. त्यानंतर तिला घरात घुसून मारहाण केली. याशिवाय कपडे फाडून मारहाण करत असल्याचा व्हिडिओही शूट केला. याशिवाय आरोपी महिलेच्या सासूनं वेटर महिलेचे पाय पकडून बाहेर फरफटत नेलं. तर व्यक्तीच्या पत्नीनं तिचे केस ओढून मारहाण केली. त्यानंतर वेटर महिलेनं जखमी अवस्थेत ठाण्यातील श्रीनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेनं पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ती ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहते. बारमध्ये काम करत असताना तिची एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर दोघांचे सूत जुळले. परंतु याबाबतची माहिती व्यक्तीच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी याला विरोध केला. त्यानंतर आपला पती हा वेटर महिलेच्या घरी गेल्याचं समजताच पत्नीनं सासू आणि इतरांसह थेट महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल आहे.

IPL_Entry_Point

विभाग