Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस यशस्वी का आहेत? पत्नी अमृता यांनी सांगितले दोन गुण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस यशस्वी का आहेत? पत्नी अमृता यांनी सांगितले दोन गुण

Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस यशस्वी का आहेत? पत्नी अमृता यांनी सांगितले दोन गुण

Dec 06, 2024 01:29 PM IST

Maharashtra New CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. गट्यांनी शपथ घ्यावी ही जनादेशाची व जबाबदारीची भावना आहे, असे मत त्यांच्या पत्नी अमृता फडणीस यांनी व्यक्त केलं.

देवेंद्र फडणवीस यशस्वी का आहेत? पत्नी अमृता यांनी सांगितले दोन गुण
देवेंद्र फडणवीस यशस्वी का आहेत? पत्नी अमृता यांनी सांगितले दोन गुण (PTI)

Maharashtra New CM Devendra Fadnavis : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार या दोन्ही नेत्यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यशस्वी का आहेत ? या बाबत प्रतिक्रिया देत त्यांनी त्यांचे दोन गुण सांगितले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या “देवेंद्र स्वत: म्हणाले होते की, पुन्हा येईन. पण ते स्वत:साठी नाही तर जनतेसाठी आले. हा जनतेचा सन्मान आहे. महायुतीने जो निर्णय घेतला तो आज तुमच्यासमोर आहे. आमचे नेता सक्षम आहेत. त्यांना लोकांच्या भावना माहिती आहे. ते लवकरच लोकार्पित निर्णय घेणार आहेत.

संयम आणि चिकाटीमुळे देवेंद्र पुन्हा मुख्यमंत्री

अमृता फडणीस म्हणाल्या, फडणवीस यांना सर्वोच्च पदावर नेणारे दोन गुण म्हणजे संयम आणि चिकाटी आहे. संयम आणि चिकाटी हेच मुख्य गुण देवेंद्र फडणवीस यांना पुढे घेऊन गेले आहेत. फडणवीस सहाव्यांदा आमदार झाले आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, याचा आनंद आहे, पण सरकारच्या जनादेशाबद्दल जबाबदारीची भावना आहे. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी त्यांना पुन्हा काम करायचे होते, त्या उद्देशाने त्यांनी काम केले, असे देखील अमृता फडणीस म्हणल्या.

देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी २०१४ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहे. यानंतर त्यांनी २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी 'मी पुन्हा येईन' असा नारा दिला होता. मात्र, २०१९ मध्ये भाजपला १०५ जागा मिळाल्या असल्या तरी तत्कालीन संयुक्त शिवसेनेसोबतची युती तुटल्याने ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही. मात्र, अजित पवार यांच्या सोबत त्यांनी पहाटे शपथविधी करत ८० तास मुख्यमंत्री राहिले. ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. मात्र, काही वेळातच अजित पवार स्वगृही परतले. यानंतर त्यांचे सरकार कोसळले व महाविकास आघाडीचे सरकार आले.

 

२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. 'मी पुन्हा येईन' या त्यांच्या घोषणेमुळे अनेकांनी त्यानाना ट्रोल केले. तसेच विरोधकांच्या उपहासाला देखील त्यांना सामोरे जावे लागले. अखेर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमताने पुनरागमन केल्याने. फडणवीस हे तिसऱ्यांना मुख्यमंत्री झाले. भाजपने त्यांच्या नेतृत्वात १३२ जागा जिंकून २८८ सदस्यांच्या विधानसभेत बहुमताजवळ पोहोचले. तर महायुतीने २३५ जागा जिंकत विरोधकांचा धुव्वा उडवला.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर