एलन मस्कमुळे भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांची ट्रम्प सरकारमधून हकालपट्टी; कारण आले समोर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एलन मस्कमुळे भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांची ट्रम्प सरकारमधून हकालपट्टी; कारण आले समोर

एलन मस्कमुळे भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांची ट्रम्प सरकारमधून हकालपट्टी; कारण आले समोर

Jan 23, 2025 11:05 AM IST

Vivek Ramaswamy : भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी एलॉन मस्क यांच्या डीओजीई प्रकल्पातून बाहेर पडले आहे. या साठी त्यांच्यावर मस्क यांच्यावर दबाव होता, असे बोलले जात आहे.

एलन मस्कमुळे भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी ट्रम्प सरकारमधून पडले बाहेर? कारण आले समोर
एलन मस्कमुळे भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी ट्रम्प सरकारमधून पडले बाहेर? कारण आले समोर (AFP)

Vivek Ramaswamy News : भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांची अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांनी अलीकडेच एच१बी व्हिसाबाबत केलेल्या विधानामुळे त्यानां बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे. या सोबतच ट्रम्प सरकारचा डीओजीई म्हणजेच सरकारी कार्यक्षमता विभाग सांभाळणारे अब्जाधीश एलन मस्क यांचा देखील रामास्वामी यांना बाहेर काढण्याचा दबाव त्यांची हकालपट्टी करण्यामध्ये एक प्रमुख करण असल्याचं बोललं जात आहे.

रामास्वामी हे बाहेर पडावे यासाठी त्यांच्यावर रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख नेते व मस्क यांचा मोठा दबाव असल्याचे बोलले जात आहे. पॉलिटिकोने दिलेल्या वृत्तानुसार, रामास्वामी यांनी डीओजीईमधून बाहेर पडण्यापूर्वी एक्सवर पोस्ट केली आहे, जिथे त्यांनी अमेरिकेची संस्कृती आणि लोकांना कामावर घेण्याच्या पद्धतींवर टीका केली आहे. त्यात एच-१बी व्हिसाचा देखील त्यांनी उल्लेख आहे.

ट्रम्प यांच्या निकटवर्तीय रिपब्लिकन नेत्याने सांगितले की, विवेक रामास्वामी यांनी पक्षात परत येण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मस्क नाराज झाले आहेत. त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात येईल अशा चर्चा सुरू होत्या. दरम्यान त्यांनी केलेल्या ट्विटनंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

रामास्वामी यांच्या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. काही समीक्षकांचे म्हणणे आहे की ते अमेरिकेतील कामगारांना कमकुवत दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काहींनी त्यांच्या मुद्द्याचे समर्थन देखील केले आहे. खरं तर एच १ व्हिसा हा नॉन इमिग्रंट व्हिसा कार्यक्रम असून ज्याच्या मदतीने अमेरिकन कंपन्या तात्पुरत्या स्वरूपात परदेशी कामगारांना कामावर ठेवतात. या विशेषत: अशा नोकऱ्या आहेत, ज्यासाठी विशेष कौशल्य आणि ज्ञान आवश्यक असतं. अमेरिकेत एच-१बी व्हिसाधारकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे.

मात्र, डीओजीमधून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी टीमला, ट्रम्प आणि मस्क यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'डीओजीई'च्या निर्मितीत मदत करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मला खात्री आहे की एलन आणि त्यांची टीम हे काम चोखपणे करतील. ओहायोमधील माझ्या पुढच्या वाटचालीबद्दल मी लवकरच सांगेन, असे देखील ते म्हणाले.

रामास्वामी ओहायोच्या गव्हर्नरपदाची निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. शुक्रवारी अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली. रामास्वामी यांनी यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता, परंतु नंतर त्यांनी या शर्यतीतून माघार घेतली. रामास्वामी हे ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांचे निकटवर्तीय मानले जातात.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर