Malad ice cream finger case: आइसक्रीममध्ये सापडलेल्या त्या तुटक्या बोटाचं गूढ उकललं! डीएनए चाचणीत महत्त्वाची माहिती समोर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Malad ice cream finger case: आइसक्रीममध्ये सापडलेल्या त्या तुटक्या बोटाचं गूढ उकललं! डीएनए चाचणीत महत्त्वाची माहिती समोर

Malad ice cream finger case: आइसक्रीममध्ये सापडलेल्या त्या तुटक्या बोटाचं गूढ उकललं! डीएनए चाचणीत महत्त्वाची माहिती समोर

Updated Jun 28, 2024 09:38 AM IST

Finger in ice cream cone case : या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईत मालाड येथे आइस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोट सापडल्याने खळबळ उडाली होती. २७ जून रोजी आलेल्या डीएनए अहवालात हे बोट पुण्यातील फॉर्च्युन कंपनीतील सहाय्यक ऑपरेटर व्यवस्थापक ओंकार पोटे यांचे असल्याचे उघड झाले. आहे.

आइस्क्रीममध्ये सापडलेल्या त्या बोटाचं गूढ उघड! डीएनए चाचणीत महत्वाची माहिती आली समोर
आइस्क्रीममध्ये सापडलेल्या त्या बोटाचं गूढ उघड! डीएनए चाचणीत महत्वाची माहिती आली समोर

malad ice cream finger case : मालाड येथे या महिन्याच्या सुरुवातीला एका डॉक्टरने मागवलेल्या ऑनलाइन आइसक्रीम कोनमध्ये माणसाचं तुटलेलं बोट सापडल्यानं खळबळ उडाली होती. या प्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिस तपास करतांना पुण्यातील आणि गाझियाबाद  येथील कंपनीत पोहोचले होते. तपासा दरम्यान, हे बोट पुण्यातील इंदापूर फॉर्च्युन कंपनीतील सहाय्यक ऑपरेटर व्यवस्थापक ओंकार पोटे यांचे असल्याचे उघड झाले होते. या बोटाची डीएनए चाचणी करण्यात आली असून हे बोट पोटे यांचेच असल्याचे उघड झाले आहे.

१२ जून रोजी, मालाडचा रहिवासी ऑर्लेम ब्रेंडन सेराओ (वय २६) व त्याच्या बहिणीने ऑनलाइन ऑर्डर केलेले Yummo कंपनीचे बटरस्कॉच आईस्क्रीम खात असताना आइस्क्रीम कोनमध्ये मानवी बोट सापडले होते. यानंतर सेराओने सुरुवातीला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आईस्क्रीम कंपनीकडे तक्रार नोंदवली पण कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने मालाड पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी तपास करत पुण्यातील फॉर्च्युन डेयरी प्रकल्पापर्यंत पोहोचले. याच कंपनीत उत्पादन प्रक्रियेदरम्यान पोटे यांचे बोट कापले होते. दरम्यान, पोलिसांनी या बोटाचे व पोटे यांच्या डीएनए नमुने घेऊन टे फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले होते. हे बोट कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवण्यात आले असून, यम्मो आइस्क्रीम कंपनीच्या व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना, फॉर्च्यून डेअरीचे मालक मनोज तुपे म्हणाले की त्यांची कंपनी चौकशीला सहकार्य करत आहे आणि डीएनए चाचणीच्या निकालाची वाट पाहत आहे. त्यांनी नमूद केले की गाझियाबाद आणि जयपूरसह अनेक युनिट्समध्ये  आइस्क्रीम कोन तयार केले जातात.  पुढील पडताळणीसाठी सरकारी पथके या ठिकाणी पोहोचले आहेत. या घटनेत त्यांचा कारखाना पूर्णपणे जबाबदार नाही.  कारण मुख्य कंपनीने गाझियाबाद आणि जयपूरसह अनेक युनिट्समधून आइस्क्रीम कोन भरून आणले होते. तूपे  म्हणाले की, अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तपासासाठी पथके पाठवली आहेत. "त्या विशिष्ट तारखेला अशीच घटना घडली होती की नाही हे शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी  गाझियाबाद आणि जयपूरमधील युनिट्समध्ये पथके पाठवली आहेत.

पोलिसांनी सांगितले की, दिवसभरात प्राप्त झालेल्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात बोटाच्या भागाचा डीएनए आणि आइस्क्रीम फॅक्टरीचे कर्मचारी ओंकार पोटे यांचा डीएनए एकच असल्याचे आढळले आहे.  इंदापूर कारखान्यात आईस्क्रीम भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोटे यांच्या मधल्या बोटाचा एक भाग कापला गेला होता. हे बोट मालाडच्या डॉक्टरांनी मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये सापडले होते, त्यानंतर डॉक्टरांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली," असे अधिकाऱ्याने सांगितले. माहिती दिली. आइस्क्रीम कोनमध्ये सापडलेल्या बोटाचा तुकडा हा पुण्यातील इंदापूर येथील एका आईस्क्रीम कारखान्यातील कर्मचारी पोटे यांचे असल्याचे 'डीएनए' चाचणीत उघड झाले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर