Vanraj Andekar Murder : पुण्यात रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दवाखान्यात नेन्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. २०१७ साली झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत वनराज आंदेकर हे नगर सेवक म्हणून निवडणूक आले होते. त्यांच्या घरातील अनेक जण हे नगरसेवक राहिले आहेत. वनराजचे वडील हे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. वर्चस्व वादातून वनराजची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
पुण्यात गुंड शरद मोहोळ यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतांना आता वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
वनराज आंदेकर २०१७ ते २०२२ मध्ये नगर सेवक म्हणून निवडून आले होते. वनराजची आई राजश्री आंदेकर या देखील नगरसेवक होत्या. त्यांनी दोन वेळा नगर सेवक पद भूषवलं आहे. तर वनराज आंदेकरचे काका उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक राहिले आहेत. वत्सला आंदेकर यांनी पुण्याचं महापौरपद भूषवलं आहे.
पुण्यात नाना पेठेत आंदेकर कुटुंबियांची दहशत आहे. वनराज आंदेकरची हत्या होण्यामागे एक अतिक्रम कारवाई करणीभूत ठरल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार उदयकांत आंदेकर यांनी येथील कोमकर कुटुंबाला दुकान चालवन्यास दिले होते. मात्र, हे दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पडून टाकलं. याच रागातून त्याच्या दाजीने वनराजची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. घरगुती वादातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे.
पुण्यात अनेक गुन्हेगारी टोळ्या आहेत. या टोळीत वर्चस्व वादातून झटापटी होत असतात. आंदेकर टोळीची देखील पुण्यातील मध्यवर्ती भागात दहशत आहे. वनराजचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत यांना प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या सोबतच खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे सूर्यकांत आंदेकर यचावर दाखल आहे. बंडू आंदेकर व इतर सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याआंतर्गत कारवाई करनेत आली आहे. सूर्यकांत आंदेकर यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. आंदेकर माळवदकर या दोन टोळीतील भांडणे कुप्रसिद्ध आहेत. वनराजचे वडील सूर्यकांत आंदेकर हे जन्मठेपेची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आल्यावरही त्यांची गुन्हेगारी सुरूच होती.