कसबा पेठेत रवींद्र धंगेकरांचा पराभव करणारे हेमंत रासने आहेत कोण? पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कसबा पेठेत रवींद्र धंगेकरांचा पराभव करणारे हेमंत रासने आहेत कोण? पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला

कसबा पेठेत रवींद्र धंगेकरांचा पराभव करणारे हेमंत रासने आहेत कोण? पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला

Nov 25, 2024 09:48 AM IST

Kasba Assembly Election Result Ravindra Dhangekar Loss : विधानसभेचे निकाल लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला आहे. पुण्यातील कसबा पेठेत मतदारसंघात पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जायंट किलर ठरलेले रविंद्र धंगेकर यांचा भाजपच्या हेमंत रासने यांनी पराभव केला आहे.

काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव करणारे 'हू इज हेमंत रासने'? पोटणीवडणुकीतील पराभवाचा घेतला बदला
काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव करणारे 'हू इज हेमंत रासने'? पोटणीवडणुकीतील पराभवाचा घेतला बदला

Kasba Assembly Election Result Ravindra Dhangekar Loss : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांचं पानिपत झालं. काँग्रेसचे अनेक मोठे नेते देखील पराभूत झाले आहेत. पुण्यातील २१ मतदार संघात महायुतीचे १८ उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत पुण्यातील कसबा पेठ मतदार संघात आमदार रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने असा सामना रंगला. यात हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.

कसबा पेठ मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी गिरीश बापट हे सातत्याने निवडून येत होते. बापट खासदार झाल्यावर मुक्ता टिळक या कसबा पेठेतून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांचं आजारपणामुळे निधन झालं. त्यामुळे या ठिकाणी पोट निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक देशात गाजली. या निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. या विजयामुळे  ते देशात चर्चिले गेले. या नंतर त्यांनी काँग्रेसकडून खासदारकी देखील लढवली. मात्र, यात त्यांचा पराभव झाला.

दरम्यान, विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत देखील काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना तिकिट दिली. तर भाजपने पोटनिवडणुकीत पराभूत झालेले हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत हेमंत रासने याची जादू चालली नाही. भाजपचे हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत पोटनिवडणुकीतील पराभवाचा बदला घेतला आहे.

कोण आहेत हेमंत रासने ?

हेमंत रासने भारतीय जनता पक्षाचे नेते असून ते पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. भाजपाच्या मुक्ता टिळत यांचं आजारपणामुळे निधन झाल्यानंतर येथील कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांनी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, तेव्हा रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पराभव केला होता. दरम्यान, या पराभवानंतर देखील २०२४ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी रासने यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. हा विश्वास त्यांनी सार्थकी लावत रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर