Who is Harshwardhan Vasantrao Sapkal : महाराष्ट्रात काँग्रेसची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. अनेक जण पक्षाला रामराम करण्याच्या मार्गावर आहेत तर नवे नेतृत्व समोर येण्यास तयार नाही.त्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पक्षाचे बडे नेते कसे बसे निवडून आले. त्यामुळे काँग्रेसमध्ये खांदे पालट होईल अशी शक्यता होती. त्यानुसार गुरुवारी काँग्रेसपक्षश्रेष्ठींनी नाना पाटोळे यांना पदावरून दूर करून महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षापदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड केली आहे. हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत ? त्यांचा राजकीय जीवणप्रवास कसा राहिला याची माहिती घेऊयात.
विधानसभा निवडणुकीत जबरदस्त पराभव स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये आता मोठे बदल करण्यात आले आहे. एके काळी काँग्रेसचा गढ असणाऱ्या राज्यातून आता पक्ष हद्दपार होऊ घातला आहे. अशा स्थितीत पक्षनेतृत्वाने नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेतलं असून त्यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाणा येथील काँग्रेसचे माजी आमदार आहेत. २०२१४ ते २०१९ दरम्यान ते आमदार राहिले होते. २०१९ मध्ये त्यांच्या पराभव झाला होता. सपकाळ यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सुरुवात केली होती. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या (एनएसयूआय) माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. सुरवातीला ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास हा चढता राहिला आहे. १९९९ ते २००२ मध्ये ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांचा राहुल गांधी यांच्याशी संपर्क आला. त्यांनी गेल्या १५ वर्षांपासून काँग्रेसच्या कोअर टीममध्ये काम केलं आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गाडगे महाराज, तुकडोजी महाराज व गांधीवादी विचारांचा प्रभाव आहे. ते सध्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे अध्यक्ष आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९६८ साली शेतकरी कुटूंबात झाला. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी धारण केली. शेतीस्वावलंबनासाठी तसेच टंचाईमुक्तीसाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात केलेला जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे. सपकाळ यांनी काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी म्हणून सुध्दा काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे.
संबंधित बातम्या