अॅडल्ट चित्रपटात काम करणाऱ्या व ठाण्यात ओळख लपवून राहणाऱ्या बन्ना शेख उर्फ रिया बर्डे हिला ठाणे पोलिसांनी पोलिसांनी अटक केली आहे. हिल लाईन पोलिसांनी बन्ना शेखला बनावट कागदपत्राच्या आधारे भारतात वास्तव्य करण्याच्या आरोपावरून पकडलं आहे. बनावट कागदपत्रे मिळवून बन्नानं भारतीय नागरिकत्व मिळवलं होतं. तिला अचक केल्यानंतर बनावट कागदपत्रे बनवणारे रॅकेट कार्यरत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
ठाण्यात रिया बर्डे बनून बांगलादेशी बन्ना शेख रहात होती. बांगलादेशी मॉडेल बन्ना संपूर्ण कुटूंबासोबत बांगलादेशमधून पश्चिम बंगालमध्ये आली होती. त्यानंतर ती मुंबईतील ठाणे परिसरात रिया बर्डे म्हणून राहू लागली. परंतु तिचे खरे नाव बन्ना शेख. ती अडल्ट चित्रपटात काम करणारी पोर्न स्टार आहे. तिच्या संपूर्ण कुटूंबाकडे आधार कार्ड, पासपोर्ट अन् मतदान कार्ड मिळाले आहे. बन्ना शेख तिची आई रुबी शेख बहीण मोनी शेख अन् भाऊ रियाज शेख हे चौघे घुसखोरी करुन बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये आले.
बांगलादेशी अॅडल्ट फिल्म स्टार रिया अरविंद बर्डे ऊर्फ आरोही हिला ठाणे येथून अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य केल्याचा तिच्यावर आरोप आहे. उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिस ठाण्यात रिया बर्डेची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया बर्डे च्या ओळखीबाबत वर्षभरापूर्वी तपास सुरू झाला होता. तिचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट यांची जन्मस्थळे वेगवेगळी होती. काही ठिकाणी पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा, काही ठिकाणी हुगळी तर काही ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर.
रिया बर्डेवर बनावट शिक्षण प्रमाणपत्र आणि पासपोर्ट बनवण्याचा ही आरोप आहे. या आठवड्यात महाराष्ट्रात अशाच प्रकारच्या प्रकरणात आणखी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या भारतात राहत होते.
रिया बर्डेच्या वडिलांचे नाव अरविंद बर्डे आहे. आरोही बर्डे आणि बन्ना शेख या नावांनीही ती इंडस्ट्रीत ओळखली जाते. अंजली बर्डे आणि रुबी शेख असे त्याच्या आईचे नाव आहे. तिच्या भावाचे नाव रवींद्र तसेच रिझिया शेख आहे. बहिणीचे नाव रितू शेख आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रियाच्या आईचा विवाह अमरावतीयेथील अरविंद बर्डे याच्याशी झाला होता. यानंतर ती भारतात राहू लागली. सध्या रियाचे आई-वडील कतारमध्ये राहतात.
मिळालेल्या माहितीनुसार, बर्डे ही अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीची अभिनेत्री आहे. राज कुंद्राच्या प्रॉडक्शनमध्येही तिने काम केले आहे. याशिवाय तिने गहना वशिष्ठसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आयएमडीबीच्या वेबसाईटनुसार, ती 'आमरस' चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखली जाते. यापूर्वी तिला वेश्या व्यवसायाच्या प्रकरणातही अटक करण्यात आली होती.