Kamla Neharu Hospital news : पुण्याच्या मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय आज सकाळी संशयीत दहशतवादी घुसल्याची अफवा पसरली. पोलिस कंट्रोलरूमला या याबाबत फोन करून तातडीने पोलिसांचे पथक रुग्णालयात पोहोचले. दरम्यान, सुरक्षारक्षकांनी तातडीने तिघांना रूममध्ये बंद केले. पोलिस पथक डंख होताच त्यांनी रुग्णालयातून इतर रुग्ण व नातेवाईकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे तीन व्यक्ती दहशतवादी किंवा बांगलादेशी असल्याच्या संशय व्यक्त केला जात होता. परंतु हे दहशतवादी किंवा बांग्लादेशी नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या बाबत उपयुक्त संदीप गिल यांनी माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेले तरूण पुण्यातील लोहियानगर परिसरात राहणारे आहेत. ते मूळचे बिहार येथील आहेत. पोलिसांनी त्यांची चौकशी करत असतांना त्यांच्या जवळील आधार कार्ड ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळ कोणतेही घातक शस्त्र आढळले नाहीत. काही स्थानिकांनी या नागरिकांचे फोटो समाजमाध्यमांवर बांग्लादेशी म्हणून पोस्ट करून खोटा मेसेज पसरवला होता, दरम्यान, हे तिघेजण आज कमला नेहरू रूग्णालयात आले असता सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहून सुरक्षारक्षकांनी पोलीस कंट्रोलला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे.
या बाबत पोलिस उपयुक्त संदीप गिल म्हणाले, काही लोकांनी सोशल मीडियावर या लोकांचे फोटो टाकलेत होते. आज हे तिघे जण कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये रक्ताची चाचणी करण्यासाठी आले होते. हे तिघे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्यक्तिसारखे आढळल्याने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दवाखान्यात जात तिघांना ताब्यात घेतले. तयांची चौकशीत केली असता त्यांच्याकडे आधार कार्ड मिळाले आहे. त्या आधार कार्डच्या पत्त्यावरून आम्ही चौकशी पुढील चौकशी करत आहोत. सध्या त्यांची चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यांच्याकडे कुठलेही हत्यार आढळून आले नाहीत. हे तिघेजन मदरसा आणि मज्जीदसाठी पैसे गोळा करण्यासाठी पुण्यात आले होते. व्हायरल फोटो कमला हॉस्पिटल प्रशासनाकडे गेल्यामुळे त्यांनी पोलिसांना फोन केला होता, त्यानुसार करावाई करण्यात आली.
या बाबत कमला नेहरू रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार काल सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. रुग्णालयात आलेले तिघे तेच असल्याचा संशय आला. हे तिघेही ब्लड टेस्ट करायला आले होते. त्यांनी रुग्णालयाबाहेर जाऊन फोटो देखील काढले होते. त्यांचे वागणे संशयास्पद वाटल्याने आम्ही रुग्णालयात एका ठिकाणी बंद केले. त्यांच्या बॅगमध्ये बिहारचे आधार कार्ड असून या बाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. तसेच पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. रुग्णांची सुरक्षा म्हणून तातडीने पाऊल उचलून रुग्णालय बंद करण्यात आले, असे देखील सुरक्षा रक्षक म्हणाले.