Nagpur accident : राज्यातील महानगरात अपघातांची संख्या वाढली आहे. पुणे, मुंबई येथील अपघाताच्या घटना ताज्या असतांना राज्याची उपराजधानीत देखील गेल्या ४८ तासात झालेल्या विविध अपघात ६ जणांनी जीव गमावला आहे. मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास कोराडी पांजरा परिसरात कारमध्ये रील तयार करण्याच्या नादात कार वरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकला धडकुन दोन तरुण ठार तर तिघे जखमी झाले आहेत.
नागपुरात अपघात वाढले आहेत. तसेच चंगळवादी संस्कृती देखील वाढली आहे. दारू पिऊन तरुणाई गाडी चालवत असल्याचे आढळले आहे. काही दिवसांपूर्वी एका भरधाव गाडीने रस्त्यावर झोपलेल्या मजुरांना चिरडले होते. त्यानंतर काल एका भरधाव वेगात असलेल्या स्कूलबसने वृद्धाला चिरडले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. आज पहाटेच्या सुमारास मित्राकडे पार्टी करून रात्री फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणांच्या गाडीला अपघात झाला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कार रस्त्यावर असणारे सहा बॅरिकेट तोडत दुभाजकावर जाऊन आदळली या दोन विद्यार्थी ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे पीएम संजय भोंगाडे यांचा मुलाचा समावेश असल्याची माहिती आहे. जखमी मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काही मित्र हे रात्री मित्राकडे पार्टी करून फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी गाडीत त्यांनी रील तयार करण्यासाठी मोबाइल काढला. रील तयार करण्याच्या नादात चालकाचे गडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटणस्थळांचा पंचनामा केला आहे. तर जखमींना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
नागपुरात गेल्या ४८ तासात हीट अँड रन अपघातात ६ तरुणांचा जीव गेला आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भावेश भरणे नामक तरुण दुचाकीवरुन जात असताना ट्रकने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. तर मंगळवारी पहाटे झालेल्या कार अपघात दोघे ठार झाले. तर वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकाश महंत हा भांडेवाडी परिसरातून पायी जात असताना एक वाहनाने त्याला जोरदार धडक देऊन अपघात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर एका स्कूलबसने एका सायकल स्वराला धडक दिल्याने बस खाली येऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना सिसीटीव्हीत कैद झाली आहे.
संबंधित बातम्या