मुलाला दवाखान्यात नेताना काळाचा घाला! भरधाव ट्रॅक्टरने बाईकला धडक दिल्याने आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार, परभणी येथील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुलाला दवाखान्यात नेताना काळाचा घाला! भरधाव ट्रॅक्टरने बाईकला धडक दिल्याने आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार, परभणी येथील घटना

मुलाला दवाखान्यात नेताना काळाचा घाला! भरधाव ट्रॅक्टरने बाईकला धडक दिल्याने आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार, परभणी येथील घटना

Nov 11, 2024 08:52 AM IST

Parbhani Accident: परभणी वसमतमार्गावर भीषण अपघात झाला असून मुलाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या आई वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे.

मुलाला दवाखान्यात नेताना काळाचा घाला! भरधाव ट्रॅक्टरने बाईकला धडक दिल्याने आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार, परभणी येथील घटना
मुलाला दवाखान्यात नेताना काळाचा घाला! भरधाव ट्रॅक्टरने बाईकला धडक दिल्याने आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार, परभणी येथील घटना

Parbhani Accident: आजारी मुलाला दवाखान्यात घेऊन जात असतांना आई वडिलांसह मुलावर काळाने घाला घातला आहे. एका भीषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना परभणी येथे परभणी वसमत मार्गावर रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. एका भरधाव ट्रॅक्टरने दुचकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. तिघांच्या मृत्यूमुळे हलहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नंबर नसलेला ट्रॅक्टरचालवणाऱ्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

एकनाथ बाबाराव घुगे (वय ३७), शुभांगी एकनाथ घुगे (वय ३४) आणि मुलगा समर्थ एकनाथ घुगे (वय ११ रा. अंजनवाडी ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली), असे अपघातात ठार झालेल्या आई, वडील, मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मयत एकनाथ यांचा भाऊ नवनाथ बाबाराव घुगे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, घुगे दाम्पत्य हे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी येथील राहिवासी आहेत. ते त्यांचा मुलगा समर्थ हा आजारी असल्याने त्याला परभणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जात होते. ते परभणी शहरातून वसमतकडे जाणार्‍या महामार्गावर जात असताना आसोला पाटीजवळ त्यांच्या दुचकीला एका नंबर नसलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. हा ट्रॅक्टर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येत त्याने घुगे यांच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरची धडक बसून खाली पडताच त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी व स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन ते रूग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

पोलिसांनी या प्रकरणी विनानंबरच्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरच्या अज्ञात चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनि शिवकांत नागरगोजे हे करत आहेत.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर