Bareilly Murder : बरेलीमध्ये एका महिलेने तिच्या शेजाऱ्याची हत्या केल्याची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेदरम्यान, महिलेने प्रथम तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर मध्यरात्री शेजाऱ्याच्या घरी जाऊन त्याची हत्या केली. या प्रकाराने पोलिसही गोंधळले आहेत.
ब्लॅकमेलिंग आणि वारंवार धमक्या देऊन त्रास देत असलेल्या शेजाऱ्याचा एका विवाहितेने खून केला. ही घटना बरेली येथे घडली. विवाहितेने आधी त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या दरम्यान, तिने प्रियकराचा गळा दाबून खून केला. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथे उघडकीस आली आहे. प्रियकराला भेटण्यासाठी जाण्यापूर्वी महिलेने चहा मधून तिच्या पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. यानंतर ती तिच्या प्रियकरकडे गेली होती.
करचोबी ठेकेदार इक्बाल अहमद असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रवीना हिला अटक करण्यात आली आहे. टीची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. प्रेयसी रविनाने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. पण इक्बालचे कुटुंबीय या घटनेत इतरांचाही सहभाग असल्याचा आरोप करत आहेत.
बरेलीतील भोजीपुरा जिल्ह्यातील घुर समसपूर गावात राहणाऱ्या इक्बाल अहमद यांचा मृतदेह ३० जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या घराबाहेर पायऱ्यांवर आढळला होता. इक्बालची पत्नी शहनाज हिने शनिवारी रवीना आणि तिचा पती इदरीश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तिच्या पतीचे रवीनासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे रवीनाने पतीसोबत मिळून इक्बालची हत्या केली आहे, असा आरोप देखील करण्यात आला होता. रविवारी दुपारी पोलिसांनी रवीनाला अटक करून तिची चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली.
चौकशीदरम्यान रविनाने सांगितले की, इक्बाल कपड्यांवर जरीकाम करायचा आणि या बहाण्याने तो तिच्या घरी वारंवार येत असे. यादरम्यान दोघांमध्ये फोनवरून बोलणे सुरू झाले. एक दिवशी इक्बालने तिला कपडे दाखवण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी बोलावले आणि कॉल रेकॉर्डिंग करुन बदनामी करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इक्बालने तिला अनेक वेळा ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला. सतत त्रास होत असल्याने तिने २९ जानेवारी रोजी त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
२९ जानेवारी रोजी, पत्नीला तिच्या माहेरी सोडून इक्बाल घरी परतला. त्याच दिवशी रविनाने त्याच्याशी फोनवर बोलून त्याला भेटायला बोलावले. इक्बालने तिला दोन मादक गोळ्या दिल्या आणि त्या तिच्या पतीला देण्यास सांगितल्या. रात्री ८ वाजता, रविनाने पतीच्या चहामध्ये गोळ्या मिसळल्या व त्याला चहा दिला. यामुळे तिचा पती गाढ झोपेत गेला.
रात्री ११.४० च्या सुमारास, रविनाने इक्बालला फोन करून घरी बोलावले. दोघेही घराजवळ बोलू लागले. यावेळी इक्बालने तिच्याशी शरीर संबंध ठेवले. या दरम्यान, संधी पाहून रविनाने इक्बालचा गळा आवळून खून केला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सर्व काही इतक्या वेगाने घडले की इक्बालला ओरडण्याचीही संधी मिळाली नाही. यानंतर रबिनाने त्याचा मृतदेह ओढून घराच्या पायऱ्यांवर ठेवला आणि तिच्या घरी परतली.
संबंधित बातम्या