General Knowledge: मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतरही प्लास्टिक पिशव्यांची विक्री आणि त्यांचा वापर कमी झालेला नाही. यामुळे आता प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करणाऱ्या सर्वसामान्यांवरही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिली. जगभरात प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण हा गंभीर प्रश्न आहे. यासाठी अनेक देश वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी इतका धोकादायक आहे की, जगातील जवळपास सर्व देशांनी त्याची अंमलबजावणी केली असून कठोर कारवाईला सुरुवात केली. परंतु, जगातील किती देशांनी सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे? जाणून घेऊयात.
युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, ८० देशांमध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर पूर्णपणे किंवा अंशतः बंदी घालण्यात आली. आफ्रिकेतील ३० देशांमध्ये ते पूर्णपणे लागू आहे. तर, युरोपमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरावर स्वतंत्रपणे कर किंवा शुल्क आकारण्यात येते. बांगलादेशमध्ये सर्वात प्रथम २००२ मध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली. तर, केनियाने २०१७ मध्ये जगातील सर्वात कडक पद्धतीने बंदी लागू करण्यात आली. केनियात प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास चार वर्षांचा तुरुंगवास किंवा ४० हजार डॉलर म्हणजेच ३१ लाख ५० हजार रुपये दंड होऊ शकतो. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली असली तरी काही मोजक्याच ठिकाणी सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे.
एकदा वापरून फेकले जाणारे कुठलेही प्लॅस्टिक हे सिंगल यूज प्लॅस्टिक असते. मात्र, यातील काही वस्तू रिसायकल देखील केल्या जातात. पण बहुतेकवेळा त्या फक्त फेकून दिल्या जातात. प्लॅस्टिकच्या स्ट्रॉ, कॅरीबॅग्स, पाण्याच्या बाटल्या, सोडा वगैरे पेयांच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या थाळ्या, कप, पेले, अन्नाचे डबे, प्लॅस्टिक स्टिक्स असलेले इयरबड्स, सिगारेट फिल्टर्स अशा गोष्टींचा यात समावेश होतो.
मुंबई महापालिका मुख्यालयात महापालिकेने शुक्रवारी ‘एमपीसीबी’सोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीनंतर सिद्धेश कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन प्लास्टिक विक्री व त्याचा वापर करणाऱ्या सर्वसामान्यांवर नियम उल्लंघन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली. याबाबत मुंबई महापालिकेसह सर्व महापालिकांना आदेश देण्यात आले आहेत.