Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकीबहीणयोजनेचा पहिला हफ्ता १७ ऑगस्ट रोजी जमा होणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातून १ कोटीहून अधिक महिलांचे अर्ज मान्य करण्यात आले आहे. आता महिलांना योजनेच्या पहिल्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र पात्र महिलांच्या नावावर एकाहून अधिक बँकेत खाती असतील तर त्यांना योजनेचे पैसे नक्की कोणत्या खात्यात जमा होणार आहेत, याबाबत संभ्रम आहे, मात्र आधार नंबर टाकून तुम्हाला पैसे कोणत्यात बँकेत येणार हे तपासता येणार आहे.
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना थेट लाभ मिळणार आहे. या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम हस्तांतरित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र योजनेचे पैसे नक्की कोणत्या खात्यात जमा होणार आहेत, याविषयी संभ्रम आहे. मात्र तुम्ही हे तुमच्या आधार कार्ड क्रमांकावरूनही तपासू शकता.
डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. डीबीटी प्रणालीअंतर्गत एकाचवेळी मोठ्या प्रमाणात खात्यात रक्कम पाठविण्यात येते. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक वापरून तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. यासाठी कोणतेही बँक डिटेल्स तपासले जाणार नाहीत. यासाठी तुमचे आधारकार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक केले आहे, तसेच बँक खाते सक्रीय आहे का, हे तुम्हाला तपासणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या अनेक महिलांकडे एकाहून अनेक खाती असल्याने नक्की कोणत्या बँक खात्यात आपली रक्कम जमा होणार आहे, याबाबत संभ्रम आहे. मात्र डीबीटीमार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी एकाच बँक खात्याला आधारकार्ड लिंक करता येते.