मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Truck drivers strike: ट्रक चालकांच्या संपामुळे राज्यात इंधन तुटवडा! संपाचा सर्वाधिक फटका कोणत्या जिल्ह्याला? वाचा!

Truck drivers strike: ट्रक चालकांच्या संपामुळे राज्यात इंधन तुटवडा! संपाचा सर्वाधिक फटका कोणत्या जिल्ह्याला? वाचा!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 02, 2024 11:21 AM IST

Truck drivers strike : केंद्र सरकारच्या हिट अँड रन प्रकरणी देशभरात वाहन चालक संघटनांनी संप पुकारला आहे. राज्यात सुद्धा या संपात ट्रक चालक संघटना सहभागी झाल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांचे देखील ट्रक चालक या संपात सहभागी झाले असून यामुळे अनेक ठिकाणी इंधन टंचाई निर्माण झाली आहे.

Truck drivers strike
Truck drivers strike

Truck drivers strike : केंद्र सरकारच्या हिट अँड रन प्रकरणी देशभरात वाहन चालक संघटनांनी संप पुकारला आहे. राज्यात सुद्धा या संपात ट्रक चालक संघटना सहभागी झाल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांचे देखील ट्रक चालक या संपात सहभागी झाले असून यामुळे अनेक ठिकाणी इंधन टंचाई निर्माण झाली आहे. राज्यात पेट्रोल पंपावर दुचाकी आणि कारचालकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पेट्रोल पंपावर झुंबड उडल्याने गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी हा संप मागे घेण्यात आला आहे. तर काही ठिकाणी हा संप अद्यापही सुरूच आहे.

Pune News: पुणेकरांना दिलासा! शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंप सुरू राहणार; पेट्रोल डिझेल असोसिएशनचा निर्णय

हिट अँड रन संदर्भात नव्या कायद्या संदर्भात राज्यभरात वाहतूकदार संघटनांचा संप सुरू आहे. यामुळे इंधन टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी अफवांना पेव फुटल्याने नागरीकांची पेट्रोल पंपावर झुंबड उडाली होती. दरम्यान, राज्यात काही जिल्ह्यात हा संप मागे घेण्यात आला आहे.

भुजबळ कुटुंबीयांना उपरती! जमीन बळकावल्याचा आरोपानंतर पीडित वृद्ध महिलेला २० वर्षांनी दिली थकीत रक्कम

नागपूर आणि विदर्भात ट्रकचालकांनी संप मागे घेतला आहे. यामुळे येथील इंधन पुरवठा आता सुरळीत होणार आहे. या सोबतच इतर मालाचा पुरवठा देखील सुरळीत राहणार आहे. कोल्हापुरा देखील पेट्रोल, डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांनी संपात सहभाग घेतला होता. मात्र, काल रात्री हा संप मागे घेण्यात आला आहे. या ठिकाणी इंधनाची वाहतूक पूर्वरत झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

नवी मुंबईमध्ये मात्र, ट्रकचालकांनी संप सुरूच ठेवला आहे. यामुळे इंधन अनाई भाजीपाला आवकेवर परिमाण झाला आहे. यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे.

सोलापूरमध्ये पेट्रोलियम ट्रक चालकांनी संपात सहभाग घेतला आहे. त्यांनी अद्याप देखील माघार घेतली नाही. असे असले तरी कोल्हापुरात सध्या तरी इंधन पुरवठ्यात तुडवडा भासला नाही. मात्र, काल पसरलेल्या अफवेमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली होती.

WhatsApp channel