अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाचा विजय झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष असणार आहेत.याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१७ते २०२१पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद भूषवले होते. यंदाच्या विजयानंतर ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा या निवडणुकीत पराभव झाला.अमेरिकेत एकूण ५३८इलेक्टोरल मते आहेत,बहुमतासाठी२७०मते आवश्यक असतात.
मात्र या निवडणुकीचा कोल्हापूरशी संबंध जोडला जात आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलून मधुरिमाराजे यांना उमेदवारी बहाल केली. मात्र अंतिम क्षमी मधुरिमा राजे यांनी निवडणुकीतून माघार घेत न लढण्याचा निर्णय घेतला. यामुळे मतदारसंघातून पंजा गायब झाला व निवडणुकीच्या आधीच काँग्रेस चितपट झाली.
मधुरिमाराजे यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर सतेज पाटील चांगलेच संतापलेले दिसले. यावेळी सतेज पाटील म्हणाले, आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून. मला तोंडघशी पाडायची काय गरज होती?हे काय बरोबर नाही महाराज. तुम्ही जेवढ्यांनी आग लावली आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा.’
माझी फसवणूक केल्यासारखं आहे हे. मग आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून. आम्हाला काय अडचण नव्हती. दम नव्हता तर उभारायचं नव्हतं,मी पण दाखवली असती माझी ताकद असा संताप सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
या घटनेचा संबंध अमेरिकन निवडणुकीशी जोडून मीम्स व्हायरल केले जात आहेत. तेथेही डेमोक्रॅटिक पक्षाकडून आधी विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र पहिल्याच चर्चासत्रात बायडेन अडखळल्याने डेमोक्रॅटिक पक्षाने उमेदवारी बदलून उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या कमला हॅरिस यांना संधी दिली. मात्र आता निकालात स्पष्ट झाले आहे की, मतदारांनी हॅरिस यांना नाकारून ट्रम्प यांना पुन्हा संधी दिली आहे. यानंतर जो बायडेन यांचा फोटो व्हायरल होत आहे, त्यावर लिहिले आहे की, दम नव्हता तर उभारायचं नव्हतं ना मग, झक मारली मला तोंडघशी पाडलं, मी पण दाखवली असती माझी ताकद’हे सतेज पाटलांच्या तोंडचं वाक्य टाकण्यात आलं आहे.