EXCLUSIVE : न्या. शिंदे समितीचा अहवाल HT Marathi च्या हाती.. कुणबी नोंदीबाबत काय दडलंय रिपोर्टमध्ये?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  EXCLUSIVE : न्या. शिंदे समितीचा अहवाल HT Marathi च्या हाती.. कुणबी नोंदीबाबत काय दडलंय रिपोर्टमध्ये?

EXCLUSIVE : न्या. शिंदे समितीचा अहवाल HT Marathi च्या हाती.. कुणबी नोंदीबाबत काय दडलंय रिपोर्टमध्ये?

Published Oct 30, 2023 09:29 PM IST

Sandeep Shinde Committee Report : मराठा आरक्षणाबाबत तसेच मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारने गठित केलेल्या संदीप शिंदे समितीचा अहवाल समोर आला आहे. हा अहवाल समितीने सरकारला सादर केला आहे.पाहुयात यातील नोंदी

Sandeep Shinde Committee Report
Sandeep Shinde Committee Report

Shinde Commitee Report : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यासंदर्भात राज्य सरकारने गठित केलेल्या संदीप शिंदे समितीचा (Justice shinde committee maratha reservation) अहवाल समोर आला आहे. हा अहवाल समितीने सरकारला सादर केला आहे. समितीने म्हटलं आहे की,१ कोटी ७३ लाख ७० हजार ६५९ कागदपत्रांची तपासणी केल्या असून यातून ११ हजार ५३० कुणबी जातींच्या नोदी सापडल्या आहेत. याचे प्रमाण ०.०६ टक्के इतके अत्यल्प आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर समिती आणखी पुरावे गोळा करण्यासाठी हैदराबादला जाणार आहे. मात्र सध्या तेथे विधानसभा निवडणुकांची धामधून सुरू असल्यानं पुरातन नोंदी तपासण्याच्या कामाला विलंब लागत असल्याचं समितीनं म्हटलं आहे.

 

Justice shinde committee maratha reservation
Justice shinde committee maratha reservation

आज झालेल्या बैठकीनंतर शिंदे समितीने राज्य सरकारलाआपलाअहवाल सादर केला . उद्या (मंगळवार) हा अहवाल कॅबिनेटसमोर येणार असून त्यानंतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बोलून उद्यापासूनच नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

Justice shinde committee maratha reservation
Justice shinde committee maratha reservation

शिंदे समितीच्या अहवालात काय लिहिलंय?

  • शाश्वत व आधारभूत काम करण्यासाठी समितीला २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • जिल्हानिहाय अभिलेखे तपासणी करून अहवाल ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत समितीस सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
  • समितीने१ कोटी ७३ लाख ७० हजार ६५९ कागदपत्रांची तपासणी केली.
  • ११ हजार ५३० कुणबी जातींच्या नोदी सापडल्या आहेत. कुणबी दाखल्यांच्या नोंदी वाढत आहेत.
  • जुने अभिलेख अंत्यत जीर्ण अवस्थेत असल्याने वाचनास विलंब.
  • अभिलेखाच्या बहुतांश नोंदी उर्दू, मोडी व फारशी भाषेत आहेत. या भाषेचे जाणकार उपलब्ध होत नसल्याने समितीला विलंब होत आहे.
  • आणखी नोंदी तपासण्यासाठी समिती हैदराबादला जाणार
  • समितीच्या मराठवाड्यातील ८ जिल्यात बैठका झाल्या. बहुतांश कागदपत्रे १९६७ च्या पूर्वीची आहेत.

 

Justice shinde committee maratha reservation
Justice shinde committee maratha reservation

 

 

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक २३,१३,९४६ नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी ९३२ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या.
  • जालन्यात १९,७४,३९१ नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी २,७६४ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या.
  • हिंगोलीमध्ये ११,३९,३४० नोंदींची छाननी केली. त्यापैकी १७६२ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या.
  • नांदेडमध्ये १५,१३,७९२ नोंदी तपासण्यात आल्या. यात केवळ ३८९ कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या.
  • परभणीत २०,७३,५६० नोंदींची छाननी केली. त्यापैकी १,४६६ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या.
  • लातूरमध्ये २०,७३,४६४ नोंदीची तपासणी केली. त्यात ३५४ कुणबी जाती दिसून आल्या.
  • धाराशिवमध्ये ४०,४९,१३१ नोंदी चेक करण्यात आल्या. त्यापैकी ४५९ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या.
  • बीडमध्ये २२,३३,०३५ नोंदी तपासल्या. त्यात ३,३९४ कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या.

Justice shinde committee maratha reservation
Justice shinde committee maratha reservation

एकूण १ कोटी ७३ लाख ७० हजार ६५९ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात ११ हजार ५३० कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या