‘मृत्यूनंतर काय होते’, इंटरनेटवर सर्च करून नागपूरमधील मुलीची आत्महत्या; ऑनलाइन मागवले होते मृत्यूचे सामान
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘मृत्यूनंतर काय होते’, इंटरनेटवर सर्च करून नागपूरमधील मुलीची आत्महत्या; ऑनलाइन मागवले होते मृत्यूचे सामान

‘मृत्यूनंतर काय होते’, इंटरनेटवर सर्च करून नागपूरमधील मुलीची आत्महत्या; ऑनलाइन मागवले होते मृत्यूचे सामान

Jan 28, 2025 07:16 PM IST

Nagpur News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने आधी चाकूने स्वत:वर वार केले आणि चाकूने शरीरावर क्रॉस मार्क केले त्यानंतर स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केली.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूरमध्ये एका १७ वर्षीय तरुणीने गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याआधी तिने इंटरनेटवर 'मृत्यूनंतर काय होते' याचा शोध घेतला होता. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. एका खासगी शाळेत बारावीत शिकणारी ही मुलगी तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिचे वडील नागपुरातील रिझर्व्ह बँकेत प्रादेशिक संचालक पदावर कार्यरत आहेत. वडिलांच्या म्हणण्यानुसार, ती अनेकदा इंटरनेटवर मृत्यू आणि परदेशी संस्कृतीबद्दल सर्च करत असे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने आधी चाकूने स्वत:वर वार केले आणि ऑनलाइन ऑर्डर केलेल्या 'दगड ब्लेड चाकू'ने क्रॉस मार्क केले. त्यानंतर तिने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केली. सोमवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास छत्रपतीनगर येथील घरातील बेडरूममध्ये ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तिच्या आईला दिसली. आईने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावले.  माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी तिचा मोबाइल जप्त केला असून त्याची तपासणी केली असता ती मृत्यूनंतर काय होते, याची माहिती गुगलवर सर्च करत असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती धंतोली पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली. मुलीने आपल्या डायरीत परदेशी संस्कृतींबद्दल विपुल प्रमाणात लिहिलं आहे.

या मुलीला युरोपियन संस्कृतीची आवड होती आणि ती गेल्या काही काळापासून मृत्यूचा पाठपुरावा करत होती, असे पोलिसांना आढळले. या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, यावरून ती अनेक आठवड्यांपासून आत्महत्येचा बेत आखत होती. मुलीला ऑनलाइन गेम खेळण्याचे व्यसन असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर