Sharad Pawar on Cancer : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे गेल्या १९९९ पासून मुखाच्या कॅन्सरनेग्रस्त आहेत. या दरम्यान, त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. असह्य आजार असूनही शरद पवार कधी खचले नाही. त्यांनी नेटाने या आजाराला लढा दिला आणि हरवलं सुद्धा. त्यांच्या कॅन्सर लढ्याचे अनेक किस्से सुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच ते अनेक कर्करोगांनी बाधितांसाठी आदर्श देखील आहेत. आज जागतिक कर्करोग दिवस असून या दिवशी त्यांनी ट्विट करत त्यांना झालेल्या वेदना, व्यथा मांडल्या आहेत. या सोबतच त्यांनी या रोगाविरोधात लढण्याचा निर्धार देखील व्यक्त केला आहे.
गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ कर्करोगांशी लढा देणाऱ्या शरद पवार यांनी आज जागतिक कर्करोग दिनानिमित्त एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, कर्करोगाशी लढा देणाऱ्या रुग्णांना दुःख, वेदना, उपचार, लवचिकता, धैर्य आणि प्रेम अशा संमिश्र भावनेच्या मार्गाने प्रवास करावा लागतो. आज जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोगाशी लढा देताना प्रतिबंध,शोध आणि आधुनिक उपचारपद्धती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कर्करोग मुक्तीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार करूया.
राजकारणातील भीष्माचार्य म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. त्यांनी आज पर्यंत अनेक राजकीय संकटांना तोंड देत यांना समर्थपणे तोंड देत पुरून उरले आहेत. त्यांनी त्यांचं अस्तित्व भक्कमपणे व तितक्याच ताकदीनं पुन्हा उभ केलं आहे. हे त्यांनी या विधानसभेत आणि लोकसभा निवडणुकीत सिद्ध केलं आहे. राजकीय पटलावर उमटवणाऱ्या पवारांसमोर १९९९ साली अनपेक्षित संकट उभं राहिलं. त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यांना तोंडाचा कर्करोगाच निदान झालं होतं. कर्करोग म्हटलं की अनेकांचं अवसान गळून जातं. मात्र, शरद पवार हे खचले नाहीत. त्यांनी या आजाराविषयी प्रतिक्रिया देतांना या आजाराशी आपण दोन हात करायचे व लवकरात लवकर बरं व्हायचं हा निर्धार त्यांनी केला. हा आजार गंभीर असला तरी शरद पवार हे त्यांना धैर्याने सामोरे गेले.
२००४ च्या लोकसभा निवडणूक तोंडावर असतांना, शरद पवार यांच्या डाव्या गालाला आतील बाजूने गाठ असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याची तपासणी केली असता त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं. त्यांच्यावर लगेचच काही शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. या शस्रक्रियेवेळी पवारांनी त्यांची सर्व शक्तिपणाला लावली. त्यांच्या डाव्या गालाचा सगळा भाग काढून टाकण्यात आला व त्या ठिकाणी मांडीची त्वचा लावण्यात आली. त्यांचे दात देखील काढून टाकण्यात आले होते.
त्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर पुढचे आठ दिवस जिकीरीचे होते. त्या आठ दिवसात त्यांना निवडणुकीची कामं तर सोडाच पण साधं जेवण करण देखील कठीण झालं होतं. भूल देऊनच त्यांना पाणी द्यावं लागत होतं. आठ दिवस शस्त्रक्रियेमुळे त्यांना तोंड मिटायचीही परवानगी देखील नव्हती. त्यासाठी त्यांच्या तोंडात बॉलच्या आकाराचा बोळा ठेवण्यात आला होता. अवघ्या काही मिनिटात तो रक्ताने माखायचा. या सर्व कठीण परिस्थितीतून शरद पवार यांनी बाहेर पडून पुन्हा निवडणूक प्रचारात स्वत: ला गुंतवून घेतलं. त्यांच्यावर उपचार सुरूच राहिले. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात केमोथेरपी केली जात होती. शस्त्रक्रिया केल्याच्या बाजूचा भाग सुईने जाळला जायचा. यामुळे त्यांचे ओठ, जीभ, तोडंही जळायचं. त्यांनी या आजारांवर अमोरिकेत देखील उपचार घेतले.
संबंधित बातम्या