Western Local mega block : लोकलसेवा ही मुंबईची लाईफलाइन मानली जाते. लाखो प्रवासी रोज लोकलने प्रवास करून त्यांच्या इच्छित ठिकाणी जात असतात. मात्र, आता प्रवाशांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर ४ ऑक्टोबरपर्यंत मोठा ब्लॉक घोषित करण्यात आला असून यामुळे तब्बल १५० लोकल गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
पश्चिम मार्गावरील मालाड स्थानकापर्यंत सहाव्या लाईनच्या विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी मेगा बोलकक घोषित करण्यात आला आहे. सध्या १२८ तासांचं काम बाकी असल्याने ४ ऑक्टोबरपर्यंत या मार्गावरच्या १५० लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात राम मंदिर स्टेशन ते मालाड दरम्यान ३० किमी प्रतितास वेगानं लोकल चालवल्या जाणार असून याचा परिणाम इतर गाड्यांवर होणार आहे. जसे जसे ६ व्या लाईनचे काम पूर्ण होईल तशी ही वेग मर्यादा हटवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी गोरेगाववरुन ४ फास्ट लोकल धावतात. मात्र, ४ तारखे पर्यंत लुप लाईल उपलब्ध लासण्याने या गाड्या बंद ठेवण्यात येणार आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुयार माललाड स्थानकात ब्लॉकच्या वेळी कट अँड कनेक्शनचं काम झालं असल्याने मालाड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ हा प्लॅटफॉर्म क्रमांक ४ म्हणून संबोधला जाणार आहे. सहाव्या लाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर मेल एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका तयार होणार आहे. या मुळे भविष्यात लोकलची संख्या वाढवण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. ही लाईंन या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत बोरिवलीपर्यंत नेली जाणार आहे.
चर्चगेटहून शेवटची लोकल रात्री ११.२७ वाजता सुटेल ती विरारला १.१५ वाजता पोहोचेल. चर्चगेटहून अंधेरीसाठी १ वाजता लोकल सुटेल ती १.३५ वाजता अंधेरीला पोहोचेल. बोरिवलीहून लोकल रात्री ००.१० वाजता सुटेल ही लोकल ०१.१५ ला चर्चगेटला पोहोचेल. तर गोरेगावहून ००.०७ ला सुटणारी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १.०२ ला पोहोचेल. विरार बोरिवली येथील एक अतिरिक्त लोकल चालवली जाईल. ही लोकल विरारवरुन ०३.२५ ला सुटेल ती बोरिवलीत ४ ला पोहोचेल. तर आणखी एक अतिरिक्त लोकल बोरिवलीवरुन ०४.२५ वाजता सुटेल. ही गाडी चर्चगेटला ०५.३० ला वाजता पोहोचेल.