उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता

उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता

Dec 28, 2024 06:31 AM IST

Maharashtra Weather Updates Today: उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता (AFP)

Maharashtra Weather News: महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता जवळपास १२ ते १३ जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील काही दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती असून येत्या २९ डिसेंबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, राज्यात यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, शेगाव, अकोट, खामगाव, अचलपूर, अमरावती, जळगाव, जामोद, संग्रामपूर, देऊळगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, कन्नड, भोकरदन, बीड, धाराशिव, पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर, जत आणि पुणे या भागात येत्या २९ डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गारपिटीमुळे तर हातात तोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. त्यामुळे सध्या राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत.

शुक्रवारी सकाळी नोंदवण्यात आलेले तापमान

पुणे- २८.६ (१६.४), अहिल्यानगर- २८.२ (१८.६), धुळे- ३० (१३.५), जळगाव- ३०.३ (१९.१), जेऊर- २९.५ (१९), कोल्हापूर- २८.५ (२१), महाबळेश्वर- २४.७ (१६.१), मालेगाव- २८२ (१८.४), नाशिक- २१ (१६.५), निफाड- २५.५ (१७.२), सांगली- २८.४ (२१), सातारा- ३०.२ (१९.५), सोलापूर- ३१.८ (२१.१), सांताक्रूझ- ३०.५ (१८५), डहाणू- २७.९ (१८.३), रत्नागिरी- ३०.८ (२१.७), छत्रपती संभाजीनगर- २७.२ (१९.६), धाराशिव- २९.१ (१८.४), परभणी- २९.४ (२१.५), परभणी कृषी विद्यापीठ- २८.१ (२०.९), अकोला- ३१.६ (२०.१), अमरावती- ३१.२ (२०.३), भंडारा- २९.८ (१६.८), बुलडाणा- ३० (१९.६), ब्रह्मपुरी- ३३ (१८.८), चंद्रपूर- २९ (-), गडचिरोली- २८.२ (१८.८), गोंदिया- २१.५ (१७), नागपूर- ३०.३ (१९.२), वर्धा- ३० (१८.९), वाशीम- ३०.६ (२०.२), यवतमाळ- २९.५ (-).

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर