मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Updates: सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट

Weather Updates: सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट

Jun 12, 2024 07:03 AM IST

Maharashtra Rains: महाराष्ट्रात मोसमी पावसाचे आगमन झाल्याने गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (HT)

Weather News: महाराष्ट्राच्या अनेक भागात मोसमी पावसाचे आगमन झाले. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, आणि गडचिरोली येथे वादळी पावसाचा इशारा देण्यात आला. याशिवाय, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर येथे मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्रात मंगळवारी कोणत्या भागात किती पाऊस?

मुंबई (कुलाबा- ५२ मिलिमीटर), रायगड (अलिबाग- ५४ मिलिमीटर, म्हसळा-४९ मिलिमीटर आणि मुरुड- १५४ मिलिमीटर), रत्नागिरी (दापोली- ४१ मिलिमीटर), अहमदनगर (नेवासा- ४० मिलिमीटर, शेवगाव-४९ मिलिमीटर), जळगाव (भाडगाव-५० मिलिमीटर, दहीगाव-१३६ मिलिमीटर, एरंडोल-४६ मिलिमीटर, जळगाव- ९३ मिलिमीटर, जामनेर-७५ मिलिमीटर), पुणे (बारामती-४० मिलिमीटर, सासवड-२६ मिलिमीटर), सांगली (कवठे महांकाळ- ३९ मिलिमीटर), सातारा (महाबळेश्वर-३२ मिलिमीटर), सोलापूर (बार्शी-३६ मिलिमीटर), बीड (अंबाजोगाई- ७७ मिलिमीटर, धारूर-३२ मिलिमीटर, परळी वैजनाथ- ४६ मिलिमीटर) छत्रपती संभाजीनगर (पैठण-४६ मिलिमीटर), धाराशिव (भूम-८४ मिलिमीटर, धाराशिव-६३ मिलिमीटर, कलंब- ३५ मिलिमीटर, लोहारा- १११ मिलिमीटर, तुळजापूर- ३० मिलिमीटर, उमरगा-१०५ मिलिमीटर आणि वाशी-४१ मिलिमीटर), जालना (भोकरदन-३१ मिलिमीटर, धनसांगवी-५२ मिलिमीटर, जाफराबाद-३७ मिलिमीटर, परतूर- ६२ मिलिमीटर), लातूर (अहमदपूर-४१ मिलिमीटर, औसा- १०१ मिलिमीटर, चाकूर-८७ मिलिमीटर, लातूर- ४८ मिलिमीटर, निलंगा- १२९ मिलिमीटर, रेणापूर ९५ मिलिमीटर, शिरुर अनंतपाळ-९६ मिलिमीटर), नांदेड(भोकर-५९ मिलिमीटर), परभणी (मानवत-४८ मिलिमीटर, सेलू-३५ मिलिमीटर, सोनपेठ- ५९ मिलिमीटर), अकोला- ३२ मिलिमीटर, बुलढाणा (देऊळगाव राजा- ४६ मिलिमीटर, लोणार- ३३ मिलिमीटर, सिंदखेड राजा-४४ मिलिमीटर) वाशीम (रिसोड-३८ मिलिमीटर).

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर