Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर अचानक कमी झाला होता. त्यानंतर सोमवारी मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली होती. तर सकाळपासून काही ठिकाणी ढगाळ ढगाळ झाले होते. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात थंडी सोबतच पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्यामुळे काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील देण्यात आला आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात २६ डिसेंबरला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर २७ तारखेला पुणे, पुणे घाट परिसर, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात असलेले वेलमार्क लोकेशन एरिया हे नैऋत्य दिशेला सरकले असून ते आता दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी लगत आहे. वायव्य राजस्थान वर एक लोकप्रेशर एरिया दिसून आलेला आहे अंदाज राज्यात पुढील तीन दिवस विदर्भ वगळता हवामान कोरडे असण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर तुरळक भागात म्हणजे २६ व २७ डिसेंबर रोजी विदर्भ विदर्भ वगळता तुरळक भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील २४ तासात विदर्भ वगळता किमान तापमानात दोन ते चार अंश डिग्री सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता आहे.
पुणे व आसपासच्या परिसरात पुढील तीन दिवस आकाश अंशतः ढगाळ सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस म्हणजे २६ व २७ रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात २६ आणि २७ डिसेंबरला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातीलकाही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईमध्ये सकाळी व संध्याकाळी प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिली.
राज्यात दोन दिवसांपासून राज्यातील थंडी कमी झाली आहे. मात्र, सोमवारी पुन्हा थंडीचा जोर वाढला. हवामान विभागानुसार राज्यातील आज व उद्या हवामान अंशतः ढगाळ राहून तापमानात घट होणार आहे. तर गुरुवारी व शुक्रवारी राज्यातील काही जिल्ह्यात हलक्या पावसाचाही अंदाज आहे.