Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे! पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे! पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस पावसाचे! पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार

Updated Aug 31, 2024 07:24 AM IST

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात पुढील दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. पुण्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील काही दिवस पावसाचे! पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार
राज्यात पुढील काही दिवस पावसाचे! पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार (HT_PRINT)

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. या साठी बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र कारणीभूत ठरणार आहेत. पुढील तीन दिवस विदर्भात, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज पुणे, सातारा, जळगाव, नाशिक, सोलापूर, सांभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र कच्छ किनारपट्टी आणि लगतच्या पाकिस्तान व ईशान्य अरबी समुद्रावर आहे. तसेच काल पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये आणि लगतच्या वायव्य बंगालचा उपसागर व उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आज ठळक कमी दाबाचा क्षेत्रात झाले आहे. व ते त्याच भागावर सक्रिय आहे. दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात कोकण, गोवा व विदर्भात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील २ दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जळगाव, अहमदनगर, नाशिक, पुणे व सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडात सहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आणि संपूर्ण विदर्भात मेघगर्जना व वीजांच्या कडकडात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे मराठवाडा व विदर्भासाठी पुढील चार ते पाच दिवस यलो अलर्ट अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली येथे एक सप्टेंबरला वीजांच्या कडकडाट व तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजेच २४ तासात ११५.६ ते २०४.५ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना एक तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे घाट विभागासाठी यलो अलर्ट

कोकण गोव्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसराच्या आजूबाजूच्या परिसरातील पुढील दोन दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात एक व दोन तारखेला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तीन तारखेला तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे १, २ व ३ तारखेला घाट विभागासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर