मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather updated: राज्यातून पावसाची एक्झिट तर थंडीची एन्ट्री; तापमान घसरल्याने जिल्हे गारठले

Weather updated: राज्यातून पावसाची एक्झिट तर थंडीची एन्ट्री; तापमान घसरल्याने जिल्हे गारठले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 27, 2022 02:06 PM IST

Maharastra weather update : राज्यातून मान्सून परतला आहे. परतीच्या पावसाने देखील विश्रांती घेतली आहे. यामुळे राज्यात आता थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे.

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.

मुंबई : राज्यातून मान्सून परतला आहे. परतीच्या पावसाने देखील विश्रांती घेतली आहे. हवेतील कोरडापणा वाढला असून तापमानात घट झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातीक अनेक जिल्ह्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाली आहे. यामुळे थंडीची चाहूल लागली असून नागिरक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेतांना दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या प्रमुख जिल्ह्यांसह विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची चाहूल लागली आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळत आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांचा गरम कपडे घेण्याचा कल वाढला आहे. या सोबतच आतापासून शेकोट्या देखील पेटू लागल्या आहेत.

तापमानात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, सध्या उत्तरेकडून थंड वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. या सोबतच या हवेत कोरडेपणाही वाढला आहे. त्यामुळे ऊन आणि थंडी दोन्हीनी मोठ्या प्रमाणात पडत आहेत. पहाटे थंडी दिवस गर्मी आणि पुन्हा रात्री थंडी असा वातावरणातील बदल नागरिक अनुभवत आहेत. पुण्यात तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यात किमान तापमान १७ अंशांपर्यंत आले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ ते १५ अंशाच्या आसपास आहे. तर कमाल तापमान देखील घट नोंदवली गेली आहे.

सध्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरु आहे. तर दुसरीकडे थंडीचा जोर वाढला आहे. ज्यावेळी कोरडी असते त्यावेळी तापमानात चढ किंवा उतार होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग