Maharashtra weather update: राज्यातील हवामानात सध्या मोठा बदल अनुभवायला मिळत आहे. सकाळी थंडी तर दुपारी ऊन अशी स्थिती नागरिक अनुभवत आहे. दरम्यान, आत राज्यावर पावसाचे संकट आहे. शनिवारी विदर्भाला अवकाळी पावसाने जबरदस्त तडाखा दिला. अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह, गारपीट आणि पावसाने झोडपले. दरम्यान, पुढील काही दिवस ही परिस्थिती राहणार आहे. आज देखील मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तर मारठवड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. शनिवारी राज्यातील अमरावती, यवतमाळ, वर्ध्यासह इतर काही भागांमध्ये गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले. आजही राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ३ ते ४ दिवस विदर्भाच्या काही भागात, मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये तर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार आज, आज एक हवेची चक्रीय स्थिती दक्षिण गुजरात व लगतच्या भागावर आहे. एक द्रोनिका रेषा दक्षिण गुजरात पासून मध्य महाराष्ट्रातून अरबी समुद्रात जात आहे. तसेच अँटी सायक्लॉन म्हणजेच प्रतीचक्रवात फ्लोमुळे साऊथ ईस्टर्ली तसेच साऊथ साऊथ ईस्टर्ली वारे हे बंगालच्या उपसागरावरून आद्रता घेऊन पेनिन्सुलार इंडियावरुन जात आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात जास्त करून आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, या भागात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे उद्या ११ फेब्रुवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात ११ व १२ फेब्रुवारीला औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये तुरळ ठिकाणी मेघगर्जनेसहित अति हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर संपूर्ण विदर्भात आजपासून १५ फेब्रुवारी पर्यंत तुरळक ते काही ठिकाणी मेघगर्जनेस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मेघगर्जना आणि वीजांचा कडकडाट होत असतांना खुल्या किंवा, झाडाखाली, किंवा झाडाखाली उभे राहू नये, असे आवाहंन करण्यात आले आहे.
पुणे आणि परिसरात आकाश मुख्यता ढगाळ राहणार आहे. विशेषता अकरा फेब्रुवारीला सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात १२ फेब्रुवारी नंतर साधारण दोन डिग्रीने घट होण्याचा अंदाज आहे.