मुंबई - राज्यातील अनेक भागात तापमानात चढ उतार सुरु आहेत. आता पूर्व-विदर्भ क्षेत्रातील अनेक जिल्ह्यात २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रविवार, २५ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे. मुख्यत: सोमवार (२६ फेब्रुवारी) रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षित आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हल्का ते मध्यम स्वरुपाचा चक्रवात, रॉयल सीमा, तेलंगाणा व दक्षिण छत्तीसगडमधून विदर्भाकडे येत आहे. यामुळे हवेत आर्द्रता असेल. २४ फेब्रुवारीला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. २५ फेब्रुवारीला बुलढाणा अकोला, अमरावती, वाशिम, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, नागपूर, भंडारा, वर्धा व गोंदिया जिल्ह्यात विरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २५ फेब्रुवारी रोजी विजांच्या कडकडाटासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पुढली ४८ तासाच किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही. त्यानंतर किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे.
संबंधित बातम्या