मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Monsoon Update : मॉन्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण; भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची अपडेट

Monsoon Update : मॉन्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण; भारतीय हवामान विभागानं दिली महत्वाची अपडेट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 25, 2023 10:14 AM IST

Monsoon Update : भारतीय हवामान विभागाने मॉन्सून संदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. मॉन्सून पुढे सारकण्यास पुढील दोन दिवसांत अनुकूल वातावरण तयार होणार असून ११ ते १२ जून दरम्यान मान्सून राज्यात दाखल होणार आहे.

Conditions are likely to become favourable for further withdrawal of the southwest monsoon. (AP)
Conditions are likely to become favourable for further withdrawal of the southwest monsoon. (AP) (HT_PRINT)

मुंबई : मॉन्सून संदर्भात हवामान विभागाने महत्वाची उपडते दिली आहे. मॉन्सून बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. तसेच हा मॉन्सून पुढे सरकण्यास पुढील दोन दिवसांत पोषक वातावरण तयार होणार आहे. यामुळे येत्या ११ ते १२ जून च्या दरम्यान मॉन्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Eknath Shinde : 'यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असण्याची शक्यता; शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये'

सध्या मान्सून अंदमान-निकोबार बेटावरच रेंगाळला आहे. दरम्यान, ढगांचा पुढे सरकण्याचा वेग देखील मंदावला आहे. काही दिवसांनी नैऋत्य वाऱ्यांना गती मिळणार असून ७ जूननंतर मान्सून वेगाने पुढे सरकणार असण्याचा वर्तवण्यात आला आहे. दरवर्षी मॉन्सूनचे आगमन हे १ जून रोजी केरळमध्ये होत असते. मात्र, यंदा हा मॉन्सून ४ जून रोजी दाखल होणार आहे. साधारणत: ७ जून नंतर पाऊस सक्रिय होणार आहे. राज्यात ९ जून तर मुंबईत १५ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहण्याचा अंदाज जाहीर केला आहे.

तापमानात होणार घट

काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, मॉन्सून सक्रिय झाल्याने पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानात घड होण्याची शक्यता आहे. साधारणत: चार ते पाच अंशांनी ही घट होणार आहे. मुंबई आणि उपनगरांनाही उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग