Pune water supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील या भागात पाणीपुरवठा राहणार बंद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune water supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील या भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Pune water supply : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील या भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Published Jul 23, 2024 08:33 AM IST

Pune water supply : पुण्यात गुरुवारी काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील या भागात पाणी पुरवठा राहणार बंद
पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील या भागात पाणी पुरवठा राहणार बंद

Pune water supply update : पुण्यात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये चांगला पाऊस होत असल्याने पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र, असे असले तरी येत्या गुरुवारी पुण्यातील काही भागातील पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची दखल घेऊन पाणी योग्य वापरावे असे आवाहन पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

पर्वती जलकेंद्राअंतर्गत ६०० मिलिमीटर जलवाहिनीतून होत असलेली गळती थांबविण्यासाठी येत्या गुरुवारी (दि. २५) देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहे. या कामामुळे शहराच्या पूर्व भागातील काही पेठा व लगतच्या परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या जलवाहिनीतुन पाणी पुरवठा होणाऱ्या सर्व भागाला शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

या ठिकाणी पाणी पुरवठा राहणार बंद

पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिलेल्या महितीनुसार, पर्वती जलकेंद्रातील टाकीवरून भवानी पेठेकडे जाणाऱ्या ६०० मिमी व्यासाच्या वाहिनीत स्वारगेट मेट्रो स्टेशन पुढील बाजूला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यातून पाण्याच्या अपव्यय होत असल्याने ही गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी केले जाणार आहे. या कामामुळे शंकरशेठ रस्ता परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकिज मागील परिसर, पर्वती दर्शनचा काही भाग, मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंदनगर, महर्षीनगरचा काही भाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकिज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढली

पुण्यात घाट विभागात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरण साखळीत पाण्याची पातळी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने पुण्याच्या पाण्याचा प्रश्न हळू हळू कमी होत चालला आहे. दरम्यान, पुण्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर घाट विभागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर