मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Water Supply Stop In Many Parts Of Thane City Due To Pipeline Work On 15 March 2023

Thane Water Supply : ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा; शहरातील पाणीपुरवठा ‘या’ दिवशी राहणार बंद!

Thane Water Supply News
Thane Water Supply News (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
Mar 13, 2023 03:44 PM IST

Thane Water Supply News : पालिकेच्या वतीनं शहरातील जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळं ठाण्यातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

Thane Water Supply News : राज्यातील प्रमुख शहरं असलेल्या मुंबई आणि पुण्यानंतर आता ठाण्यातही नागरिकांसमोर पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहिलं आहे. कारण आता ठाणे महापालिकेकडून जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये उद्यापासून पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी पालिकेकडून जलवाहिनीचं स्थलांतर करण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळं उद्या संध्याकाळपासून ठाण्याच्या अनेक भागांमधील पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता ठाणेकरांना पुढील तीन दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील माजीवाडा येथील नॅशनल हायवेलगत असलेल्या जलवाहिनीचं इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेकडून बुधवारी काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं बुधवारी सकाळी ९ वाजेपासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील अनेक भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुरुवारी दुपारनंतर कमी दाबानं शहरात पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. त्यामुळं आता मुंबई आणि पुण्यानंतर ठाण्यातील नागरिकांनाही पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.

कोणत्या भागांमधील पाणीपुरवठा राहणार बंद?

जलवाहिनीच्या स्थलांतराचं काम हाती घेण्यात आल्यानंतर ठाण्यातील इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, इटर्निटी, जॉन्सन, साकेत, माजीवाडा, घोडबंदर रोड, पातलीपाडा, गांधीनगर, सिद्धांचल, ऋतुपार्क, जेलटाकी, सिद्धेश्वर, समतानगर, रुस्तमजी वसाहत परिसरासह कळवा-मुंब्रा शहरातील काही भागांमधील पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळं आता पुढील काही दिवसांसाठी पाण्याचा आवश्यक साठा करून पालिकेस सहकार्य करण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.