मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Water Supply : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी ‘या’ भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Water Supply : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी ‘या’ भागांत पाणीपुरवठा राहणार बंद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 06, 2024 08:59 AM IST

Pune water issue : पुण्यात देखभाल दुरुस्तीसाठी पाण्याच्या पाइप लाइनची दुरुस्ती केली जाणार असून यामुळे गुरुवारी काही भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देखील सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Pune water issue
Pune water issue

Pune water supply issue : पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाइप लाइनच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहे. यामुळे पुण्यातील काही भागातील पाणी पुरवठा हा गुरुवारी बंद ठेवला जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी हा पाणी पुरवठा कमी दाबणे आणि अपुरा होणार आहे. यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Pune metro : पुणेकरांसाठी ऐतिहासिक क्षण! मेट्रो धावली मुठा नदीखालून; पाहा फोटो

पुणे महानगर पालिकेच्या पर्वती जलकुंभ येथे विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे गुरुवारी (दि ८) पाणीपुरवठा विभागाकडून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या पर्वती टाकीवर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि ९) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग १ आणि २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लाॅट, ढोले मळा, सॅलिसबरी पार्क परिसर, गरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयक नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाब नगर याबरोबरच कोंढवा खुर्दचा काही भाग, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर आणि धनकवडी या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

WhatsApp channel

विभाग