मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Water Cut: ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' भागांत दोन दिवस पाणीपुरवठा बंद

Thane Water Cut: ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा! 'या' भागांत दोन दिवस पाणीपुरवठा बंद

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 22, 2023 05:09 PM IST

Water cut in thane on 24 and 25 March : ठाण्यात शुक्रवारी आणि शनिवारी काही भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने ठाणे महापालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले.

Thane Water Supply
Thane Water Supply

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाण्यात पाणीपुरवठा विषयक दुरुस्ती कामामुळे येत्या शुक्रवारी (२४ मार्च २०२२) आणि शनिवारी (२५ मार्च २०२२) काही भागातील पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. यामुळे ठाणे महानगरपालिकेकडून आवश्यक पाण्याचा साठा करण्याचे आणि पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे शुक्रवारी (२४ मार्च २०२३) दुपारी १२.०० वाजल्यापासून ते शनिवार (२५ मार्च २०२३) दुपारी १२.०० वा पर्यंत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, मुंब्रा प्रभाग समिती मधील वाय जंक्शन ते मुंब्रा फायर ब्रिगेड परिसरापर्यंत व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेडून देण्यात आली आहे.

ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

WhatsApp channel

विभाग