मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rain Update : पुण्यातील धरणे पुन्हा 'ओव्हर फ्लो'; मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune Rain Update : पुण्यातील धरणे पुन्हा 'ओव्हर फ्लो'; मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 13, 2022 03:29 PM IST

Pune Rain News : पुणे जिल्ह्यात रविवार पासून पावसाने तूफान हजेरी लावली आहे. धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणे पुन्हा ओव्हर फ्लो झाले असून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

खडकवसला धरण
खडकवसला धरण

पुणे : पुणे जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले आहे. रविवार पासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. धरण परिसर अनाई घाट माथ्यावर जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पण्याचा येवा धरणात होत असून यामुळे पुन्हा जिल्ह्यातील धरणे ही ओव्हर फ्लो झाली आहेत. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत, वरसगांव या धरणातून तर पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या पवना धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

पुण्यात रविवार पासून पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी ढगफूटी सदृश पाऊस झाल्याने पुणेकरांची दैना उडाली होती. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खडकवसला धरण साखळीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या प्रकल्पातील चार धरणे ही पूर्ण क्षमतेने भरली आहे. धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात आणि येणाऱ्या पाण्यात वाढ होत आहे. परिणामी तरी येत्या दोन तासांमध्ये नदीपात्रामध्ये विसर्ग वाढविण्यात येणार आहे.

सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरणात ४० मिलिमीटर, वरसगाव धरणक्षेत्रात २० मि.मी., पानशेत धरण परिसरात १८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारी सकाळपासून चारही धरणांच्या परिसरात जोरदार बरसत आहेत. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत १९२९ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. सकाळी ११ वाजल्यानंतर हा विसर्ग ३४२४ क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार आहे. दुपारी १.०० वाजता ४,२८० क्यूसेक करण्यात आला आहे. यात आवश्यकतेनुसार बदल केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधीत नागरिकांना सूचना दिल्या आहेत. तर पवना धरणातून १ हजार ४०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील भाटघर, नीरादेवघर तर मुळशी तालुक्यातील मुळशी धरणातूनही विसर्ग सुरू आहे. ताम्हीनी घाटातही मोठा पाऊस सुरू असून यामुळे मुळशी धरणाची पाणी पातळी वाढत आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या