Viral Video: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मुंबई मेट्रोच्या डब्यात पाणीगळती, व्हिडिओ व्हायरल-water leakage in mumbai metro video goes on viral ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मुंबई मेट्रोच्या डब्यात पाणीगळती, व्हिडिओ व्हायरल

Viral Video: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मुंबई मेट्रोच्या डब्यात पाणीगळती, व्हिडिओ व्हायरल

Sep 26, 2024 08:17 AM IST

Mumbai Metro Viral Video: मुंबई मेट्रोचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून प्रशासनाची खिल्ली उडवली जात आहे.

मुंबई मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल
मुंबई मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल

Mumbai Metro Water Leakage Video: मुंबई आणि शहर परिसरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याच पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रोतील संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोच्या डब्यात पावसाच्या पाण्याची गळती झाल्याचे पाहायला मिळाले. प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला, जो पाहून नेटकरी हैराण झाले.

दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात. मात्र, मुंबई मेट्रोचा हा व्हिडिओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओत दिसत आहे की, प्रवासादरम्यान अचानक मुंबई मेट्रोच्या डब्यात अचानक पावसाच्या पाण्याची गळती सुरू झाली. त्यानंतर प्रवाशांनी संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून शेअर केला, जो खूप पाहिला आणि शेअर केला जात आहे. मुंबईतील अनेक भागांत सध्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका मुंबई मेट्रोलादेखील बसला.

या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल चिंता व्यक्त केली. एका युजरने गंमतीने असे म्हटले आहे की, 'आम्ही प्रवास करण्यासाठी मेट्रोचे तिकीट काढले, पण सध्या आम्ही एका स्वीमिंग पूलमध्ये आहोत.' दुसऱ्या युजरने असे म्हटले आहे की, ‘मेट्रोने दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.’

मुंबईत बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती परिस्थिती बिघडली. रेल्वे, बस, उड्डाणे सर्व ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, मुंबईतील मानखुर्दमध्ये संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वाधिक २७६ मिमी पावसाची नोंद झाली. भांडुपमध्ये २७५ मिमी तर, पवईमध्ये २७४ मिमी पाऊस झाला. शिवडी कोळीवाडा आणि वडाळा विभागात १४५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.मुसळधार पावसामुळे अवघ्या काही तासांतच मुंबई जलमय झाली. परिणामी, आज (२६ सप्टेंबर) दुसऱ्या दिवशीही शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली.तसेच नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Whats_app_banner
विभाग