Pune water supply cut: पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट! बुधवारी ‘या’ भागातील पाणी पुरवठा राहणार बंद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune water supply cut: पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट! बुधवारी ‘या’ भागातील पाणी पुरवठा राहणार बंद

Pune water supply cut: पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट! बुधवारी ‘या’ भागातील पाणी पुरवठा राहणार बंद

Mar 02, 2024 06:04 AM IST

Pune water suppl cut on wednesday : पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे (pune municipal corporation water supply) देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून यामुळे बुधवारी अर्ध्या शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट असून बुधवारी शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट असून बुधवारी शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. (HT)

Pune water suppl cut on wednesday : पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे (pune municipal corporation water supply) देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहे. पालिकेने के. के. मार्केट परिसर, बिबवेवाडी, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील इस्काॅन मंदिर येथील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली असून ही कामे बुधवारी (दि ६) करण्यात येणार आहे. त्यामुळे के. के. मार्केट परिसर, बिबवेवाडी, राजीव गांधीनगर, अप्पर आणि सुप्पर इंदिरानगर, कोंढवा बुद्रुक, कात्रज आणि कोंढवा यासह दक्षिण पुण्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी (७ मार्च) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे पाणी जपून वापरा असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Pune lonavla railway megablock: पुणे लोणावळा दरम्यान रविवारी मेगाब्लॉक!अनेक लोकल रद्द, तर काही उशिराने धावणार

या भागात बुधवारी राहणार पाणी पुरवठा बंद

कोंढवा बुद्रुक, अप्पर इंदिरानगर, साईनगर, गजानन नगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर, सुप्पर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, अजमेरा पार्क, अश्रफनगर, शांतीनगर, माळवे गार्डन परिसर, श्रेयसननगर, अंबिकानगर, पवननगर, तुळजाभवानी नगर, सरगमनगर, गोकुळनगर, सोमनाथनगर, शिवशंभोनगर, गुलमोहर काॅलनी, अण्णाभाऊ साठे नगर, अप्पर डेपो, महानंदा सोसायटी परिसर, गुरूकृपा काॅलनी, श्रीकृष्ण काॅलनी, श्रीकुंजनगर, पुण्याईनगर, बालाजी नगर, शंकर महाराज मठ परिसर, अप्पर आणि लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी परिसर, मानस सोसायटी परिसर, पद्मकुंज परिसर, राजयोग सोसायटी परिसर, लोकेश सोसायटी, विश्वशंकर सोसायटी, कुंभार वस्ती, दामोदरनगर, हस्तीनापुरम, मनमोहन पार्क, तोडकर रेसिडन्सी परिसरा, स्टेट बँक काॅलनी, महालक्ष्मीनगर, पद्मजापार्क, लेकटाऊन, चैत्रबन वसाहत, चिंतामणीनगर भाग एक आणि दोन या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे.

Couple Romancing On Bike: धावत्या दुचाकीवर प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे; मग पोलिसांनी असा शिकवला धडा

खडकवासला धरण साखळीत पाणी साठा झाला कमी

पुण्यातील खडकवासला धरण साखळीतिल पाणीसाठा हा झपाट्याने कमी होत चालला आहे. मोट्या प्रमाणात पाणी कमी झाल्याने या उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन पालिकेला करावे लागणार आहे. यामुळे दिवसाआड किंवा आणखी वेगळ्या उपाय उपाय योजना पालिकेला कराव्या लागणार असल्याने पुणेकरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. खडकवासला धरण साखळीत खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे येतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर