Mumbai Water Cut : मुंबईकरांनो २ दिवस पाणी जपून वापरा; १७ व १८ ऑक्टोबरला पाणी कपात
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Water Cut : मुंबईकरांनो २ दिवस पाणी जपून वापरा; १७ व १८ ऑक्टोबरला पाणी कपात

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो २ दिवस पाणी जपून वापरा; १७ व १८ ऑक्टोबरला पाणी कपात

Updated Oct 16, 2024 10:44 PM IST

Mumbai Water Cut : मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये ५ ते १० टक्के घट झाली आहे. त्यामुळे दोन दिवस संपूर्ण महापालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात केली जाणार आहे.

मुंबईत दोन दिवस पाणी कपात
मुंबईत दोन दिवस पाणी कपात

मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे काठोकाठ भरलेली असताना मुंबईत गुरुवार व शुक्रवारी पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. वैतरणा जलवाहिनीवरील ताराळी येथील ९०० मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाल्याने जलवाहिनी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये ५ ते १० टक्के घट झाली आहे. यामुळे महानगरपालिका क्षेत्रात गुरूवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ ते शुक्रवार १८ ऑक्टोबर २०२४ या दोन दिवसांच्या कालावधीत ५ ते १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

बीएमसीनेएका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वैतरणा धरणातून ही पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये बिघाडामुळे मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारा प्रवाह कमी झाला आहे. व्हॉल्व्हमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत. दुरुस्तीच्या कामाला सुमारे ४८ तास लागतील. त्यामुळे गुरुवार,१७ ऑक्टोबर ते शुक्रवार,१८ ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील पाणीपुरवठ्यात कपात होणार आहे.

या दोन दिवशी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे सांगितले जात आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही धरणे तुडूंब भरली आहेत. यंदा मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र,तांत्रिक बिघाडामुळे पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे.

MMRC Bus Service: आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई मेट्रो-३ ची मोफत बससेवा
मुंबई शहर व उपनगरास मुख्‍यत्‍वे वैतरणा धरणातून पाणीपुरवठा करण्‍यात येतो. या धरणामधून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन व्हॉल्वमध्ये बिघाड झाला आहे. याची दुरुस्‍ती करण्‍याचे काम तातडीने हाती घेण्‍यात आले असून हे पूर्ण होण्यास ४८ तासांचा काळ लागू शकतो. या दुरूस्‍ती कामामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी गुरूवार व शुक्रवारी पाणीकपात केली जाणार आहे. नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे,असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

 

गेल्या मंगळवारी मुंबई महापालिकेने सांगितले होते की, शहराला पिण्यायोग्य पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील सात धरणांतील पाणीसाठा जलाशयातील पाण्याची पातळी ९७.८५ टक्क्यांवर पोहोचली आहे. बीएमसीच्या आकडेवारीवर आधारित, मुंबईतील तलावांचा एकत्रित पाणीसाठा १४,१६,१९४ दशलक्ष लिटर आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर