Mumbai water cut on Thursday and Friday : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. वैतरणा जलवाहिनी दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि ४) आणि शुक्रवारी (दि ५) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन दिवस मुंबईच्या पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. मुंबईतील एल व एस विभागात काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर काही विभागात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पाणी जपून वापरण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पवई वेन्चुरी येथील अप्पर वैतरणा आणि वैतरणा यामधील ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी जोडणीमध्ये गळती होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही गळती रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत काम सुरू आहे. ही गळती दुरुस्त करण्यासाठी मुख्य वैतरणा जलवाहिनी ही समानीकरण बिंदू (equalization point) भांडूप संकुल ते मरोशी बोगदा पर्यंत रिक्त करणे गरजेचे असल्याने गुरूवार (दि ०४) सकाळी १० ते शुक्रवार (दि ५) १० पर्यंत हे काम सुरू राहणार आहे. या कालावधीत काही भागात पाणी पुरवठा हा बंद ठेवण्यात येणार आहे. तर काही भागात १० टक्के पाणी पुरवठा केल्या जाणार आहे.
मलबारहिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे 'ए' विभागातील सर्व क्षेत्रात गुरूवारी (दि ४) सकाळी १० ते शुक्रवार (दि ५) रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.
मलबारहिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे 'सी' विभागातील सर्व क्षेत्रात गुरुवारी (दि ४) सकाळी १० ते शुक्रवार (दि ५) रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीतापाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.
मलबारहिल जलाशयातून व थेट पाणीपुरवठा होणारे 'डी' विभागातील सर्व क्षेत्रात गुरूवारी (दि ४) सकाळी १० ते शुक्रवार (दि ५) रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.
रेसकोर्स टनेल शाफ्टमधून पाणीपुरवठा होणारे ई विभागातील सर्व गुरूवारी (दि ४) सकाळी १० ते शुक्रवार (दि ५) रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.
जी उत्तर व जी दक्षिण विभाग - जी/उत्तर व जी/दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व क्षेत्र व वरळी हिल जलाशयातून पाणीपुरवठा होणारे जी/दक्षिण विभागातील सर्व क्षेत्रात गुरूवारी (दि ४) सकाळी १० ते शुक्रवार (दि ५) रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.
एल विभाग – खालील नमुद केलेल्या परिसरांमध्ये गुरूवारी (दि ४) सकाळी १० ते शुक्रवार (दि ५) रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ ता सांकरीतापाणीपुरवठा बंद राहील.
६० कॉर्ड मेन वेन्चुरी सप्लाय-
बीट क्र. १५६ - अप्परतुंगा, लोअरतुंगा, मारवा, रहेजा विहार, चांदिवली फार्म रोड, साकी विहार रोड, साकीनाका, इत्यादी
बीट क्र. १५७ – राम बाग रोड, चांदिवली फार्म रोड, नाहर अमृतशक्ती, आय.आर.बी. रोड, महिंद्रा क्वारी, विजय फायर रोड, संघर्ष नगर, इत्यादी
बीट क्र. १५८ – खैराणी रोड, मोहिली पाईप लाईन रोड
एस विभाग – खालील नमूद परिसरात गुरूवारी (दि ४) सकाळी १० ते शुक्रवार (दि ५) रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील.
आय.आय.टी.पवई क्षेत्र (रामबाग) -
म्हाडा जलवायू विहार, राणे सोसायटी, हिरानंदानी पवई, पंचकुटीर, तिरंदाज गावठाण, साईनाथ नगर, गोखले नगर, गरीब नगर, चैतन्य नगर, महात्मा फुले नगर, मोरारजी कंपाऊंड, रमाबाई नगर, हरीओम नगर, स्वामी नारायण नगर, गौतम नगर, इंदिरा नगर इत्यादी.
एच पूर्व विभाग - एच/पूर्व विभागातील सर्व क्षेत्रात गुरूवारी (दि ४) सकाळी १० ते शुक्रवार (दि ५) रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.
एच पश्चिम विभाग - एच/पश्चिम विभागातील सर्व क्षेत्रात गुरूवारी (दि ४) सकाळी १० ते शुक्रवार (दि ५) रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.
या प्रस्तावित कामामुळे नमूद केल्याप्रमाणे विभागात पाणीपुरवठा होईल, तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. ह्या पाणीकपाती दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात येईल. त्यामुळे या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या