Washim News : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची दगडाने ठेचून हत्या, नंतर गळफास घेत स्वत:लाही संपवलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Washim News : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची दगडाने ठेचून हत्या, नंतर गळफास घेत स्वत:लाही संपवलं!

Washim News : चारित्र्याच्या संशयातून पत्नीची दगडाने ठेचून हत्या, नंतर गळफास घेत स्वत:लाही संपवलं!

Updated Jul 06, 2024 08:25 PM IST

Washim Crime News : रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक या गावातील शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर तिच्या पतीचाही मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची दगडाने ठेचून हत्या
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची दगडाने ठेचून हत्या

वाशिमधून समाजमन हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यात एका पत्नीची निर्घृण हत्या केल्यानंतर पतीने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने हसत्या खेळत्या कुटूंबाची राख रांगोळी केली आहे. पती-पत्नीच्या मृत्यूने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक या गावातील शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर तिच्या पतीचाही मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला. लोणी गावाजवळच असलेल्या लोणार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मढी शिवारात विलास सुर्वे यांचा मृतदेह आढळला.

उषा विलास सुर्वे (वय ३५) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर विलास लिंबाजी सुर्वे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. महिलेची हत्या व पतीचा झाडाला लटकलेला अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता हा प्रकार समोर आला. शनिवारी सकाळच्या सुमारास मृत महिलेचा पती विलास सुर्वे याचा एका झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलाय त्यामुळे पत्नीची हत्या करून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पती नेहमी तिच्याशी वाद घालत होता. त्यानंतर त्याने फोटो काढण्याच्या बहाण्याने पत्नीला जंगलात नेले व दगडाने ठेचून तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

पत्नीची हत्या केल्यानंतर विलास सुर्वे याने एका झाडाला गळफास घेत आपलेही जीवन संपवले. या दाम्पत्याला १५ वर्षाचा एक मुलगा आणि १४ वर्षांची मुलगी आहे. या घटनेने या मुलांचे आईवडिलांचे छत्र हरवले आहे. या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पतीनं पत्नी व मुलीला शीतपेयातून विष देत उचललं टोकाचं पाऊल -

कॅन्सरग्रस्त पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने एका दाम्पत्यानं टोकाचं पाऊलं उचललं आहे. पतीनं पत्नीला व मुलीला शीत पेयातून विष पाजत जीवन संपवलं. हे दाम्पत्य केरळ येथून नागपूरला उपचार घेण्यासाठी आले होते. ही घटना शहरातील जरीपटका येथील विजयश्री नगर येथे घडली आहे. या घटनेत पती पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर मुलीचा जीव सुदैवाने वाचला आहे. मुलीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर