वाशिमजिल्ह्यात एक धक्कादाय़क घटना समोर आली आहे. ४ बहिणींनी मिळून एका महिलेची भररस्त्यात दगडाने ठेचून हत्या केली आहे. ही खळबळजनक घटनावाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील गौतम नगर भागात घडली आहे. आरोपी महिलांना संशय होता की, या महिलेचे आपल्या भावासोबत अनैतिक संबंध आहेत. यातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चार बहिणींनी मिळून महिलेला रस्त्यात अडवले व तिला दगड विटांनी मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला आणि आपल्या भावामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय या चार बहिणींना होता. यातूनच त्यांनी या महिलेला मारहाण केली.या प्रकरणी चारही महिलांना अटक करण्यात आली आहे.
आरोपी महिलांचे वय २० ते ३५ वर्षांमध्ये आहे. या चार जणींनी मृत महिलेच्या डोक्यात विटांनी प्रहार केला. डोक्यात जबर मार लागल्याने महिलेला रक्ताची उलटी झाली. स्थानिकांनी तिची या चार महिलांच्या तावडीतून सुटका करत तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात नेईपर्यंत तिचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी संशयित असलेल्या लक्ष्मण नावाच्या व्यक्तीनेही गळफास घेत आत्महत्या केली आहे.
विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याने प्रियकराने तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकला. त्यावेळी आईचा मृतदेह पाहून तिचे दोन्ही मुले रडायला लागली. यानंतर आरोपी प्रियकराने आपल्या मित्रासह मृत महिलेच्या दोन्ही मुलांनाही नदीत फेकून दिल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.
विवाहबाह्य संबंधातून महिला गर्भवती राहिली. आरोपीने महिलेला गर्भपात करण्यासाठी कळंबोली येथे त्याच्या मित्रासोबत पाठवले. मात्र, ८ जुलैला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी महिलेचा मृतदेह आणि तिच्या दोन मुलांना ९ जुलै रोजी वराळे येथे नेले आणि महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. आईचा मृतदेह पाहून तिचे दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. त्याने या मुलांनाही नदीत फेकून दिले.
संबंधित बातम्या