Warship accident in arabian sea :अरबी समुद्रातयुद्धसराव सुरू असतानायुद्धनौकेवर झालेल्या अपघातात एका नौसैनिकाचा मृत्यू झाला.मृत नौसैनिकाचे नावमोहितअसे होते. तसेत ते केवळ२३ वर्षांचे होते.
‘आयएनएस ब्रह्मपुत्र’ ही फ्रिगेट श्रेणीतील युद्धनौका अरबी समुद्रात मोहिमेवर होती.या युद्धनौकेचे गृहतळ मुंबई होते.युद्धासह समुद्री सुरक्षेसंबंधीचा सराव सुरू असताना अपघात झाला. त्यावेळी मोहित समुद्री पृष्ठभागावर असलेल्या नौकेचीपाहणी करत होते.
समुद्रावरती असलेल्या नौकेच्या भागातील सर्व सेन्सर्स तसेच अन्य सामग्री योग्य आहे अथवा नाही, याची तांत्रिक पाहणी करण्याची जबाबदारी मोहित यांची होती. युद्ध सरावावेळी आपले काम करत असताना त्यांचा अपघात झाला व त्यात त्यांचामृत्यू झाला.
दरम्यान कशा स्वरुपाचा अपघात झाला याची माहिती मिळू शकली नाही.