मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा! विदर्भात 'या' जिल्ह्यात ऑरेंज व यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा! विदर्भात 'या' जिल्ह्यात ऑरेंज व यलो अलर्ट

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 07, 2024 06:40 AM IST

Maharashtra Weather Update : राज्यात तापमानवाढी सोबत आता वादळी वाऱ्याचा देखील फटका बसणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात १२ तारखेपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी (Rain Alert) पासवाचा तडाखा बसणार आहे.

 राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा! विदर्भात 'या' जिल्ह्यात ऑरेंज व यलो अलर्ट
राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा! विदर्भात 'या' जिल्ह्यात ऑरेंज व यलो अलर्ट (AP)

Maharashtra Weather Update : राज्यात तापमानवाढी सोबत आता वादळी वाऱ्याचा देखील फटका बसणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात १२ तारखेपर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पासवाचा तडाखा बसणार आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Eknath Khadse : एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार, मुलगी काय करणार? रोहिणी खडसेंनी स्पष्ट सांगितलं

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, काल पूर्व विदर्भापर्यंत असलेली वाऱ्याची द्रोणिका रेषा आज विदर्भ मराठवाडा अंतर्गत कर्नाटक व तमिळनाडू पर्यंत जात आहे. पुढील पाच ते सात दिवस हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भामध्ये आज हवामान कोरडे असेल व त्यानंतर १२ तारखेपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात रात्री उकडा जाणवणार आहे. व कोकण गोव्यामध्ये वातावरण उष्ण व दमट राहणार आहे. पुढील दोन-तीन दिवस विदर्भामध्ये तुरळ ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भामध्ये काही जिल्ह्यांना आठ व नऊ तारखेला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

Nagpur News : पुण्यानंतर आता नागपुरातही पोलीस कर्मचाऱ्यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; कामाचा ताण की…

मराठवाड्यातील सोलापूर व नांदेड येथे आज काही ठिकाणी रात्री उकाडा जाणवणार आहे. विदर्भातील चंद्रपूर अमरावती व यवतमाळ येथे पुढील ४८ तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. राज्याच्या संपूर्ण भागामध्ये कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.

पुण्यात ढगाळ वातावरण

पुणे आणि परिसरात पुढील पाच ते सात दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुण्यात शनिवारी ३९.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

 

राज्यात सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमान

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ४२.३ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात चंद्रपूर, ब्रम्हपुरी, वर्धा, अमरावती येथे तापमान ४१ डिग्री सेल्सिअसच्या पुढे होते. राज्यात काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IPL_Entry_Point