मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wardha News : लाईट गेल्याने उष्णता वाढून पोल्ट्री फार्ममधील १५०० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यावसायिकाचे मोठे नुकसान

Wardha News : लाईट गेल्याने उष्णता वाढून पोल्ट्री फार्ममधील १५०० कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यावसायिकाचे मोठे नुकसान

May 22, 2024 06:28 PM IST

Chickens Death Due to Heat : वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने पोल्ट्री फार्ममधील पंखे बंद झाल्याने उष्णता वाढून१५०० कोंबड्याचा मृत्यू झाला. ही घटना वर्ध्यातील वायफड येथे घडली.

लाईट गेल्याने उष्णता वाढून पोल्ट्री फार्ममधील १५०० कोंबड्यांचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)
लाईट गेल्याने उष्णता वाढून पोल्ट्री फार्ममधील १५०० कोंबड्यांचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)

वर्धा जिल्ह्यातील वायफड येथे १५०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वादळी वारे व पावसामुळे येथे विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला होता.यामुळे पोल्ट्री फार्ममधील पंखे बंद झाल्याने उष्णता वाढून १५०० कोंबड्याचा मृत्यू झाला. या घटनेने पोल्ट्री फॉर्म चालकाचे मोठे नुकसान झाले असूनत्यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वायफड येथे शेख निसार शेख करीम यांचा पोल्ट्री फार्म व्यवसाय आहे. या पोल्ट्री फॉर्ममध्ये ५ हजार कोंबड्यांचे पालन केले जात होते. उन्हाळ्यात उष्णतेपासून बचावासाठी पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांची योग्य निगा राखावी लागते. पोल्ट्री फॉर्ममधील तापमान संतुलित ठेवावे लागते. तापमानाचा पारा वाढला असतानाच अचानक विद्युत पुरवठा खंडितझाल्याने पोल्ट्रीशेडमधील तापमान वाढले अन् १५०० कोंबड्यांचा मृत्यू झाला.

उन्हाळ्यात व हिवाळ्यात पोल्ट्री फॉर्ममधील कोंबळ्याची योग्य पद्धतीने निगा राखण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. १५०० कोंबड्यांच्या मृत्यूमुळे शेख निसार या पोल्ट्री व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे आर्थिक मदतीची मागणी त्यांनी केली आहे.

मोसमी पाऊस केरळमध्ये कधी धडकणार?

प्रति चक्रीवादळ आणि अल निनोच्या प्रभावामुळं यंदा पूर्व आणि दक्षिण भारतातील अनेक भागात तीव्र उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. उकाड्यामुळं लोक अक्षरश: हैराण झाले आहेत. उष्ण आणि दमट हवामानापासून दिलासा मिळावा म्हणून लोक मोसमी पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या सर्वांसाठी भारतीय हवामान विभागानं खूषखबर आणली आहे.

नैर्ऋत्य मॉन्सून (monsoon hit kerala) आज २२ मे २०२४ रोजी दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरिन परिसर, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात दाखल झाला आहे. येत्या दोन दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, अंदमान-निकोबार बेटांचा उर्वरित भाग, अंदमान समुद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग