मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wardha Crime: अनोळखी व्यक्तीकडे दारूसाठी मागितले पैसे, नकार देताच डोक्यात दगड घालून हत्या

Wardha Crime: अनोळखी व्यक्तीकडे दारूसाठी मागितले पैसे, नकार देताच डोक्यात दगड घालून हत्या

Jun 24, 2024 11:41 PM IST

Wardhacrimenews : करणने विनोदकडे दारुसाठी पैसे मागितले होते. मात्र त्याने दिले नसल्याने दारूच्या नशेत असलेल्या करणने विनोदची दगडाने ठेचून हत्या केली.

वर्ध्यात एकाची डोक्यात दगड घालून हत्या
वर्ध्यात एकाची डोक्यात दगड घालून हत्या

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे झालेल्या हत्येच्या घटनेने खळबळ माजली आहे. एका व्यक्तीची भररस्त्यात डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली.सोनेगाव मार्गावर ही घटना घडली. या घटनेतदोनमहिलाही जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरुनच ताब्यात घेतलं. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे मृत व्यक्ती व आरोपी एकमेकांना ओळखतही नव्हते.

विनोद डोमाजी भरणे (रा. सोनेगाव) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर करण मोहिते असं आरोपीचं नाव आहे. घटनेनंतर स्थानिकांनी आरोपीला पकडून त्याची धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिलं. आरोपीला वर्धा शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे तर २ जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार करणने विनोदकडे दारुसाठी पैसे मागितले होते. मात्र त्याने दिले नसल्याने दारूच्या नशेत असलेल्या करणने विनोदची दगडाने ठेचून हत्या केली. आरोपी देवळीच्या तहसील कार्यालयासमोरील झोपडपट्टीत राहतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचं सांगितले जात आहे.

मृतविनोद आबाजी भरणे हा देवळी येथील आपले काम आटोपून आपल्या गावी सोनेगावला जात होता. गावाकडे जाण्यासाठी तो पोलीस वसाहतीसमोर रिक्षाची वाट पाहत उभा होता. त्यावेळी मद्यपी आरोपीने विनोदकडे पैसे मागितले. विनोद आणि आरोपी एकमेकांना ओळखत नव्हते. तरीही आरोपी त्याच्याकडे पैसे मागत होता. विनोदने त्याला पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने विनोदला दगडाने हल्ला केला. रस्त्यावर निपचीत पडलेल्या विनोदच्या डोक्यात आरोपीने ५ ते ६ वेळा दगडाने हल्ला केला. यावेळी तेथे उपस्थित लोक केवळ बघ्याची भूमिक घेत होते व हत्येचा थरार मोबाईलमध्ये कैद करण्यात गुंतले होते.

आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ही घटना घडत असताना तेथे प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका महिलेने या घटनेची संपूर्ण हकीकत सांगितली. विनोदच्या गावची असलेली महिला त्याला वाचवण्यासाठी पुढे आली होती, ती सुद्धा या हल्लायत जखमी झाली आहे. आणखी एक महिला यात जखमी झाली आहे. रस्त्यावरून जाताना आरोपीने विनोदला थांबवलं आणि दारूसाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने आरोपीने त्याला मारहाण केली. विशेष म्हणजे ही घटना पोलीस वसाहतीसमोर घडली.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर