मुंबई : सहा महिन्यांपासून कामाच्या शोधत असलेल्या तरुणाला जॉब न मिळाल्याने तसेच त्याच्या आईला एका खटल्यात जमिन घेऊ न शकल्याने नैराश्यात असलेल्या मालाडच्या तरुणाने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्याने गूगल वर मृत्यूचे सोपे मार्ग कुठले या बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ही बाब गूगलवर लक्ष ठेवण्याऱ्या इंटरपोलच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने याची मुंबई पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत दोन तासांत त्या तरुणाला शोधून काढत त्याचे समुपदेशन करत आत्महत्ते पासून परावृत केले.
हा तरुण २८ वर्षांचा असून तो मुंबईच्या मलाड परिसरात राहतो. दरम्यान, मंगळवारी दुपारी मुंबई पोलिसांना इंटरपोलचा ईमेल आला. त्यात इंटरपोलने त्यांना या तरुणाचा मोबईल क्रमांक आणि तो राहत असल्याचे टिकणाची माहिती देत तो आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त लखमी गौतम यांनी या मेलची तातडीने दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनावक चव्हाण आणि इतर कर्मचार्यांचे पथक तयार करत दोन तासात या तरुणाचा शोध घेतला. हा तरुण मालाड परीसारत भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले.
पोलिसांनी त्याची चौकशी करत गूगलवर सर्च करत असलेल्या 'आत्महत्येचा सर्वोत्तम मार्ग' याबद्दल विचारले असतात त्याने हो म्हणत त्याची कहाणी सांगितली. त्याला काम मिळत नसून तसेच त्याच्या आईला दोन वर्षांपासून एका प्रकरणात जमिन मिळत नसल्यामुळे तो निराश झाला होता. आईच्या जमीनासाठी त्याच्याकडे पैसे देखील नव्हते. हे पैसे जुळवता आले नसल्याने त्याने तसेच कायदेशीर कारवाईसाठी खर्च करू शकत नसल्याने त्याने हताश होऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.
हा तरुण मूळचा राजस्थानचा येथील आहे. तो कामासाठी तीन वर्षांपूर्वी मुंबईत आला होता. कनिष्ठ कॉलेजची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने कॉम्प्युटरमध्ये डिप्लोमा देखील पूर्ण केला. त्याने मीरा रोड येथील एका रिअल इस्टेट कार्यालयात नोकरी मिळाल्याचे सांगितले. मात्र, सहा महिन्यांपूर्वी त्यांची नोकरी गेली. यानंतर त्याने काम मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले, पण नोकरी मिळू शकली नाही. यामुळे तो चिंतेत होता.